Ticker

6/recent/ticker-posts

# गावकऱ्यांनो_ग्रामसभेत_सहभागी_व्हा #

# गावकऱ्यांनो_ग्रामसभेत_सहभागी_व्हा #

सुनिल पाटील
संपादक, राधानगरी लाईव्ह

     दिल्लीतील संसदेला राष्ट्रस्तरावर जे महत्व आहे ते महत्व गावस्तरावर *ग्रामसभेला* असते. 1973 च्या घटदुरुस्तीनुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा आहे. ग्रामसभेला मतदारांची संस्था आणि गावाची संसद म्हटले जाते. मात्र गेली दोन वर्षे लाॕकडाऊनमुळे गावागावातील ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत. 

वर्षभरात चार ग्रामसभा अनिवार्य असून काही विशिष्ट क्षेत्रात आणि विशिष्ट वेळी अतिरिक्त ग्रामसभा घेतल्या शकतात. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या ग्रामसभा येत्या 2 आॕक्टोबर रोजी घेण्याची परवानगी दिलेली आहे. 

तेव्हा गावस्तरावरील विविध मुद्दे, विकासकामे, सार्वजनिक तथा वैयक्तिक लाभांची कामे इत्यादींचे ठराव ग्रामपंचायतींमध्ये मांडा. गावातील इतरही लोकांना ग्रामसभेत हजर राहण्यास सांगा. निवडून आलेल्या सदस्यांना इतर मिटींगमध्ये जे अधिकार असतात तेवढेच अधिकार ग्रामसभेला उपस्थित असलेल्या मतदार यादीतील लोकांना असतात हे विसरु नका. 

येत्या 2 आॕक्टोबरला महाराष्ट्रभरात कोविड नियमांचे पालन करुन गावागावात ग्रामसभा होऊ द्या. 

*गावागावासी जागवा, भेदभाव हा समुळ मिटवा |* 
*उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे ||*

- ✍️ .

Post a Comment

0 Comments