युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांनी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवले या निवेदनात त्यांनी असं नमूद केले की , आज जवळपास दोन वर्षे झाले संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 च्या सारख्या महामरीच्या साथीच्या आजारामुळे कडक निर्बंध लागू केले होते. ते निर्बंध करणे अपिहार्य होते. हे करीत असताना जनसामान्यांमधिल शासन दप्तरी नोंद असणारे कामगार , रिक्षाचालक , घरकाम करणाऱ्या महिला या घटकांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात. या सर्वानाच मदतीची आवश्यकता होती व ती आपण दिलीत .
परंतु राज्यात असाही वर्ग आहे ज्याला आपण " मध्यम वर्गीय " संबोधतो . जो शासन दरबारी कोणत्याही प्रकारे नोंदणीकृत नाहीत , की ज्या अन्वये शासनाकडून त्यांला दिलासा मिळेल . पण मध्यमवर्गीयांची परिस्थिती सुद्धा अत्यंत हलाखिची आहे . जो कुणासमोर हाथ पसरवू शकत नाही व या साथीच्या रोगाच्या महामारीमुळे ओढवलेल्या संकटाचा मार सहनही करू शकत नाही . ज्यामध्ये असंघटित कामगार , शेतमजूर , अल्पभूधारक शेतकरी ,नोंदणीकृत नसलेला छोटा - मोठा व्यवसाय करणारा व्यवसायिक , खाजगी विनाअनुदानित संस्थांमध्ये काम करणारा नोकरदार , रोजंदारीवर काम करणारा वर्ग , खाजगी गाड्यांवरील ड्रायव्हर वर्ग अशा अनेक घटकांचा समावेश होतो . हा घटक ग्रामीण व शहरी दोन्ही क्षेत्रामध्ये आहे .
अशा मध्यमवर्गालाही दिलासा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य सरकारकडून होणे अपेक्षित आहे . उच्चवर्गीयांमध्ये शक्ती ( धन ) असते तर निम्नवर्गीयांच्या पाठीशी शासन असते , परंतु मध्यमवर्गीयांची मात्र सर्वत्र कोंडीच होताना दिसते . तरी आपण यादृष्टीने सकारात्मक विचार करावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली.

0 Comments