*कणेगांवच्या माहेरवाशिणींनी पूरग्रस्तांना रक्षाबंधनाची आगळी वेगळी भेट दिली.....!*
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली.
९४०५५५५५५७
महापुराचा कणेगाव ,भरतवाडीला मोठा फटका बसला आहे. रहिवाशांचे घरे साहित्यांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे."प्रा. सुरेश आडके यांच्या संकल्पनेतून २०१९ ला "कणेगावच्या माहेरवाशिणींनी "असा व्हाँटअप ग्रुप तयार केला होता व त्याद्वारे अंकुर युवती संगटना कणेगाव तत्कालीन कार्यकर्त्या सौ. माधुरी मोरे,सौ.शैलजा पाटील व सौ जयश्री भासर यांनी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहेरवाशिणीना हाक दिली असता अवघ्या सहा दिवसात १ लाख २४ हजाराची मदत माहेरवाशिणीकडून गोळा झाली त्यामध्ये ३५० जीवनावश्यक किट तयार करण्यात आले जवळजवळ ४० माहेरवाशिणींनी च्या उपस्थितीत घरोघरी जाऊन किट पोहचविण्यात आले, तसेच काही रक्कम जि प शाळेस देणगी स्वरुपात देण्यात आली हा उपक्रम पाहून गावातील सर्व जेष्ठ नेते आणि नागरिक भारावून गेले .
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सौ.जयश्री भासर म्हणाल्या महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम राबवन्यात आला आहे गेले अनेक वर्षांपासून कणेगांव भरतवाडी या गावाचा पुर्नवसन प्रश्न रखडलेला आहे हा मार्गी लावण्यासाठी आम्ही गावकऱ्यासोबत लढायला तयार आहोत.
याप्रसंगी सौ छायादिदी यांचे मार्गदर्शन लाभले सौ. माधुरी,मोरे यांनी प्रास्ताविक केले व सौ. शैलजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments