सोशल सर्कल, सप्तरंग, अनंतशांती सामाजिक संस्थेने करनूर पूरग्रस्तानां मदत करून जपली सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर-
करनूर ता. कागल येथील महापूरामुळे नुकसानग्रस्त रामकृष्णनगर येथील कुंटुबाना सोशल सर्कल मल्टीपरपज सोसायटी, सप्तरंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच अनंत शांती सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात देणेत आला .
अतिवृष्टीमुळे कागल तालुक्यातील बहुतांश गावातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले. लोकांचे संसार उघड्यावर आले. यातील करनूर येथील बाधित झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट तसेच मास्क देऊन या संस्थेनी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या संस्थेच्या अध्यक्षा डॉ सुमित्रा भोसले, सौ रोहीणी भोसले, उदयोजक दत्ता पाटील, भगवान गुरव, सुभाष भोसले यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. बाधित कुटुंबांना देण्यात आलेल्या किट मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या सामाजिक संस्थानी सामाजिक बांधिलकी जपत करनूर येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त भागातील कुटुंबीयांकडून या संस्थाचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्ती महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौ दिपाली आवळे यांनी केले . यावेळी वैशाली नाईक, निकिता हेगडे, अरूणा कांबळे, गायत्री आवळे, संगिता कांबळे, काच न पाटील, सुनिता नलवडे, माया कांबळे, जहॉगिर शेख, सूरज कांबळे, सुनिल पाटील, दशरथ हेगडे, राजाराम आवळे, सखूबाई आवळे आण्णा आडके, आत्मा राम कांबळे आदि उपस्थित होते
.



0 Comments