Ticker

6/recent/ticker-posts

*अवनी आयोजित बाल अधिकार मंच यांच्या वतीने शाळा सुरू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.*

 दि.२७/८/२१

कोल्हापूर.


कोरणा सारख्या जागतिक महामारीमुळे गेली दीड वर्षे शाळा बंद आहेत त्या अजून सुरू झाल्या नाहीत. सध्या शाळा सुरू करण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याचे पद्धतशीर नियोजन करणे गरजेचे आहे.

  अवनी संस्थेच्या अभ्यासानुसार कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक वार्ड कोरणा मुक्त आहेत. तसेच काही वार्ड मध्ये पाच पेक्षा कमी रुग्ण आहेत त्या बालकांचे शैक्षणिक नुसकान होऊ नये यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. घरी राहिल्यामुळे मुलांच्या मध्ये चिडचिडी पणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर बालमजुरी, बालविवाह असे प्रकार जादाचे घडत आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न जरी करत करत असले तरी ऑनलाईन शिक्षणाचे अनेक तोटे आहेत. त्यामध्ये त्यांच्या शारीरिक आजारांचे गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.

त्याचबरोबर जे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत त्यांच्याकडे मोबाईल फोन नाहीत आणि असतील तर ते कामाच्या ठिकाणी पालक घेऊन जात असल्यामुळे मुलांना फोन मिळत नाही परिणामी त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. याच्या उलट ज्या मुलांच्या कडे फोन आहेत ते दिवसभर फोन घेऊन बसतात त्यामध्ये फोन चा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्वाचा विचार करून राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेले सर्वेक्षणांमध्ये८१.१८% पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास आम्ही तयार असल्याचे मत व्यक्त केले . महाराष्ट्रामधील सहा लाख ९०हजार ८२०पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता त्यापैकी पाच लाख साठ हजार८१८ पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास संदर्भात सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे.

 यानुसार पालक-शिक्षक यांचा विचार विनिमययातून तसेच वरील बाबींचा विचार करून शाळा सुरू करण्यात याव्यात. जे वार्ड कोरणा मुक्त आहेत किंवा ज्या वार्ड मध्ये कोरोना रुग्णसंख्या अत्यल्प आहेत अशा भागातील बालकांना शिक्षण मिळण्यासाठी योग्य ती काळजी घेऊन आणि आरोग्याबाबत नियमांचे पालन करून सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू कराव्यात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रादुभाव कमी असलेल्या ठिकाणी आठवड्यातून पाच दिवस शाळेत जाऊन सर्वे करून कोरोणा नियमाचे पालन करून वर्ग भरवता येतील जसे एका वेळी पंधरा वीस मुले बोलून एक दिवसीय शाळा सुरू करण्यात याव्यात .कोल्हापूर जिल्ह्यातील वार्ड पातळी व शहर पातळीवर स्थानिक युवकांच्या शिक्षण मित्र मदतीने समाज मंदिर धार्मिक मंदिरे मध्ये अशा ठिकाणी पहिली ते चौथीच्या मुलांचे वर्ग भरवून त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत एक मीटर थर्मामीटर गन असणे गरजेचे आहे .रोज मुलांचे ऑक्सिजन लेव्हल व तापमान तपासून शाळेत प्रवेश देण्यात यावा. गावातील ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांचा ठराव करून गाव पातळीवरील शाळा तातडीने सुरू करण्यात याव्यात शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे १००% लसीकरण करून घ्यावे. सदरील निवेदन माननीय संजयसिंह चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना देण्यात आले यावेळी बाल अधिकार मंच प्रतिनिधी सुमन कठमनी जोया तूर्के, राजवर्धन बंधने, आली निशा गणीभाई ,अवनी संस्थेचे कार्यकर्ते वनिता कांबळे,साताप्पा मोहिते, अन्नपूर्णा कोगले प्रताप कांबळे ,अविनाश शिंदे ,किरण नाईक सविता सोनटक्के ,संगीता लाखे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments