Ticker

6/recent/ticker-posts

*शासनाने ग्रामीण भागात घरोघरी लसीकरण मोहीम राबवावी-अमृत सावंत....!*


     सांगली-राज्यात ग्रामीण भागातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा सरचिटणीस अमृत सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना सावंत म्हणाले की गेली दीड वर्ष आपण सर्वजण महाभयंकर अश्या कोरोना रोगाशी अत्यंत कडवी झुंज देत आहोत सततच्या लॉकडाऊन मुळे गोरगरिबांची आणि ज्यांचे हातावरचे पोट आहे अशांची दयनीय अवस्था झाली आहे घरात उपासमारीची भीती आणि बाहेर कोरोना ची भीती असे असतानाही शासनाचे सर्व नियम पाळून या लढाईत खारीचा का होईना पण वाटा उचलला आहे सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण बाबतीत मानसिकता बदलली आहे आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे नागरिकांना पटले आहे लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नोंद करणे हे सर्वांनाच शक्य नाही म्हणून शासनाने ग्रामीण भागात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी असे मत सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अमृत सावंत यांनी व्यक्त केले.
                                     प्रमोद चिनके.
                                 सांगली जिल्हा प्रतिनिधी,
                                    सांगली.
                                   ९४०५५५५५५७

Post a Comment

0 Comments