Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी, कुकूडवाडी येथे शेत,विहिरी वाहून गेल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी,

कुकूडवाडी येथे शेत, विहिरी वाहून गेल्या.

मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाले आहेत. शहर व ग्रामीण भागातील ओढे, नाल्यांनी नदीकाठच्या घरांना पाण्याने वेढा घातला आहे. तर अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राधानगरी तालुक्‍यातील कुकूडवाडी येथे ओढ्याच्या प्रवाहाने डोंगर खचल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.यावेळी शेतकरी बळवंत डवरी म्हणाले कि,आम्ही मोठ्या कष्टाने पाऊस वारा सोसत भात पिक केले होते, ते या पावसाने नाहीसे झाले,वर्षभर आम्ही खायचे काय हा प्रश्न आमच्या समोर पडला आहे, तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही विनंती केली.

 
    राधानगरी तालुक्‍यात पावसाने अक्षरश: थैनाम घातला असून सर्वत्र अतिवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अशातच अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत.राधानगरी तालुक्‍यातील कुकूडवाडी येथे भुस्खलन झाले पावसाच्या पाण्यामुळे खचलेला डोंगराचा भाग भात पिक असलेल्या शेतातून वाहत गेला त्याच बरोबर शेतकऱ्यांचे शेत ही नाहीसे झाले,यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसेवक, तलाठी,कृषी सहायक यांना कळवले असता त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि बाधित शेतीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अतिवृष्टीत आलेले पिक वाहून गेल्याने हवालदिल झालेला आहे त्याच्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढवण्याची वेळ आलेली आहे,प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे.

Post a Comment

0 Comments