**जनशक्ती युवा संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने मनपा आयुक्त व शहर अभियंता यांना निवेदन**
आज भारत गॅस कंपनीच्यावतीने मनपा क्षेत्रात गॅस पाइप टाकण्याचे जे काम सुरु आहे त्याबद्दल नागरीकांनी जनशक्ती युवा संघटनेकडे लेखी तक्रारी केल्या होत्या त्या अनुशंगाने आज विविध ठीकानांची पाहणी करण्यात आली त्यानुसार असे दिसुन येत आहे की प्रत्येक ठीकानी खुदाई करुन माती रस्त्यावर टाकली जात आहे व जिथे पाइप टाकुन झाल्यावर मुजवताना मातीच टाकली आहे व कोठेही मुरुम टाकुन व्यवस्थित मुजवले नाही याबाबत सदर भारत गॅस अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी मनपाला पैसे भरले आहेत ही त्यांची जबाबदारी आहे असे सांगण्यात आले.
त्यानुसार आज मनपा आयुक्त व शहर अभियंता यांना निवेदन देण्यात आले की जर येत्या 8 दिवसात सर्व ठीकानी व्यवस्थित मुरमीकरण करुन सर्व खोदलेले रस्ते निट करावेत तोपर्यन्त सदर कंपणीस पुढील खुदाईस परवानगी देवु नये अन्यथा जनशक्ती युवा संघटने मार्फत आंदोलन केले जाइल असा ईशारा देण्यात आला .
यावेळी जिल्हाअध्यक्ष सागर जंगम ,उपाध्यक्ष श्रीकांत कोष्टी, जुबेर कंकनवाडे ,कपील रायते प्रभाकर स्वामी व इतर पदाधीकारी उपस्थीत होते

0 Comments