संतोष मांडे (भुदरगड प्रतिनिधी )
कोरोनासारख्या जागतिक महामारी ने संपूर्ण देशभर थैमान घातले आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनावर असणारा ताण आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता मडिलगे बुद्रुक व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी मोफत उपचार व सुविधेसह कोवीड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.भुदरगड तालुक्यातील मडिलगे हे गाव लोकसंख्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीने मोठे आहे. तेथे नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, के डी सी सी बँक, एम एस सी बी ऑफिस, सहकारी संस्था, आठवडी बाजार यामुळे माणसांची ये-जा चालू असते. त्यामुळे मडिलगे परिसरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. काही रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे स्कोर वाढत असून ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी गावातील हलके लक्षणे असणाऱ्या नागरिकांची त्वरित तपासणी करून त्यांना कोवीड केअर सेंटर मध्ये सहभागी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे मडिलगे परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना या केअर सेंटर मुळे दिलासा मिळाला आहे.
यावेळी आमदार प्रकाशराव आबिटकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, राहुरी कृषी विद्यापीठ संचालक दत्ताजीराव उगले, जि प सदस्य राहुल देसाई, तहसीलदार अश्विनी अडसूळ ,गट विकास अधिकारी सरिता पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन एत्नाळकर ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हावळ, सरपंच सौ. शुभांगी परीट, उपसरपंच महेंद्रसिंह देसाई यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

0 Comments