जनशक्ती युवा संघटनेच्या मागणी ला यश
जनशकतती युवा संघटना सांगली जिल्हा यांचा वतीने वॉर्ड क्र ९ मध्ये भारत गॅस कंपनी मार्फत पाइपलाईनचे काम चालु आहे सदर काम करत असताना खुदाई करण्यात आली होती सगळी माती रस्त्यावर टाकण्यात आली होती तसेच रस्ता पुर्ण खराब झाला होता लोकांना ये जा करताना खुप अडचणी होत होत्या तसेच काही लोक घसरुन पडले होते
सदर लोकांनी जनशक्ती संघटनेकडे तक्रार केली असता भारत गॅस च्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवुन जाब विचारण्यात आला तसेच उद्या आयुक्तांकडे सदर बाबीची तक्रार करणार आहोत व यामुळे कोणत्याही नागरीकास इजा झाल्यास आपल्यावरती गुन्हा नोंदवण्यात येईल असा ईशारा देण्यात आला होता .
याचा धसका घेवुन भारत गॅस कंपनीने तात्काळ जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील माती हटवुन रस्ता खुला करण्यात आला नागरीकाच्या अडचणी तात्काळ दुर झाल्याने त्यांनी संघटनेचे आभार मानले यावेळी जनशक्ती युवा संघटना जिल्हाअध्यक्ष सागर जंगम ,श्रीकांत कोष्टी, जुबेर कंकनवाडे कुभार व ईतर पदाधीकारी उपस्थीत होते


0 Comments