Ticker

6/recent/ticker-posts

*"युवा" खेळाडूंची खाऊ च्या पैशातून मदत*

 *"युवा" खेळाडूंची खाऊ च्या पैशातून मदत*


कोल्हापूर , राजारामपुरी

आपल्या ज्ञानाबरोबरच समाजभान राखणारा एक चांगला नागरिक घडवणे.आपल्या मुलांमध्ये इतरांना मदत करून प्रेम, परोपकार, सहिष्णुता अशी मुल्ये रुजवून पालकांनी आपल्या कर्तव्या पलिकडे जाऊन केलेले मार्गदर्शन आणी संस्कार याचा परिपाक म्हणजेच आपली चळवळ.

        *"गोष्ट छोटी ......डोंगरा एवढी"* असा एक अभिनव संकल्प उपक्रम *युवा स्पोर्टस्* ने सुरु केला. त्यामध्ये लहान मुले ( खेळाडू) यांना या कोरोना महामारी च्या काळात अनेक कुटुंबावर नोकरी-व्यवसाय बंद असलेने उपासमारी ची वेळ आली आहे .आशा गरजू कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

        या आवहनास काही पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यामधील *समर्थ पांढरबळे* आयुष धर्माधिकारी ,वेदांत माळवी, वेदिका माळवी ,युवराज सुर्यवंशी या चिमुरड्यांनी आपल्या खाऊ च्या साठवलेल्या पैशातून प्रत्येकी दोन हजार रु.रकमेचे धान्य, डाळी ,तेल ई . ची पाकिटे युवा स्पोर्टस् कडे सुपूर्त केली जी गरजू कुटुंबांना मदत स्वरुपात वितरित करण्यात आली. 

     यास्तव *माजी खासदार मा. धनंजय महाडिक ( प्रदेश उपाध्यक्ष भा.ज पा.महाराष्ट्र )* यांच्या हस्ते या मुलांचा सत्कार करण्यात आला या वेळी युवा स्पोर्टस् चे सचिव *उमेश पाटील*; *अनिल माळवी* तसेच *पालक*- *गणेश पांढरबळे* प्रविण सुर्यवंशी व शिवानी अमित धर्माधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments