Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्र सेवा दल शाखा निगवे खा व नागांव यांच्या संयुक्त विद्यमाने तिहेरी कार्यक्रम संपन्न

 राष्ट्र सेवा दल शाखा निगवे खा व नागांव यांच्या संयुक्त विद्यमाने तिहेरी कार्यक्रम संपन्न



राष्ट्र सेवा दल शाखा निगवे खा व नागांव यांच्या संयुक्त विद्यमाने

४ जून राष्ट्रसेवादल स्थापना दिवस,५ जून पर्यावरण दिन, आणि ६ जून शिवराज्याभिषेक दिन असा तिहेरी कार्यक्रम विद्या मंदिर निगवे खा क्रीडांगणावर आज दि.६ जून २०२१ रोजी सायं. ४ वा.आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात सेवादल ध्वज पडकावून करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सैनिकांना सेवादल आणि शिवराय यांच्या विषयी काही महत्वाची माहिती पुष्पक कांदळकर यांनी सांगितली.

त्यांनंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वेगवेगळी झाडे लावून निसर्गाशी असलेलं आपलं अतूट नातं सांगण्यात सेवादल सैनिक कसे पुढे असतात हेच या कार्यक्रमाचे मुख्य उद्धिष्ट होत.


कार्यक्रमासाठी जेष्ठ सेवादल सैनिक जे.बी.कांदळकर सर, शहाजी गोंगाने (पूर्ण वेळ कार्यकर्ता), वैभव कोराणे (राज्य मंडळ सदस्य),चंदन माटुंगे,रोहित मगदूम,सुनील महाडेश्वर आदी सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments