Ticker

6/recent/ticker-posts

**जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हा तर्फे डाकीवली केलठण रस्त्यामध्ये झालेल्या भ्रटाचाराबद्दल निवेदन **


डाकीवली केलठण रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे .या रोडच्या दुरुस्ती साठी आजवर करोडो रुपये खर्च करण्यात आले मात्र अजूनही रस्त्यात मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे अनेक वेळा या मार्गावर अपघात झालेत.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालावे व झालेला खर्च आणि कामाचा दर्जा याची पाहणी करावी आणि या कामात झालेल्या भ्रष्टाचारा ची चौकशी करावी व संबंधित दोषींना कारवाई करावी अशी मागणी जनशक्ती युवा संघटना पालघर जिल्हाच्या वतीने करण्यात आली.या वेळी पालघर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज सुर्यवंशी म्हंटले की संबंधित दोषींना शिक्षा नाही झाली तर जनशक्ती युवा संघटना आंदोलन करेल.

यावेळी  नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष श्री सुजीत भानुशाली, 
पालघर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज सुर्यवंशी, पालघर जिल्हा सचिव श्री कल्पेश पाटील, वाडा तालुका अध्यक्ष श्री स्वप्नील पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments