चंदगड व आजरा ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढविण्या संदर्भात आ.राजेश पाटील यांची आरोग्य राज्यमंत्र्यांसोबत बैठक
नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनिधी)
मोबा.९१४६४८४८०८
चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आजरा व चंदगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयचे ३० बेड वरून ५० बेडचे करण्याबाबतची मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती याची दखल घेत मंत्रालयात मुंबई येथे आरोग्य अधिकारी आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत दोन्ही तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आ.राजेश पाटील यांनी दिली.
या बैठकीमध्ये आजरा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासंबंधी प्रस्ताव सर्व बाबतीत पूर्ण करून शासनाकडे मंजुरी करीता पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले त्याच बरोबर चंदगड तालुक्यातील प्रस्तावामधील काही त्रुटी असल्याकारणाने सदरच्या त्रुटींच्या पुर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठवण्यास संबधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांनी सूचित केले असल्याबाबतची माहिती आ.राजेश पाटील यांनी याप्रसंगी बोलताना दिली. दोन्ही तालुक्यातील आरोग्याची व्यवस्था सक्षम करण्यासाठी सदरच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागा मार्फत करण्यात येईल तसेच चंदगड व आजरा तालुक्यातील नागरिकांना आरोग्यासाठी आवश्यक असणारी सेवा व त्यासाठी लागणारे कर्मचारी आपण आरोग्य विभागामार्फत देऊ असे मंत्री महोदय यांनी आश्वाशीत केले असल्याची माहिती याप्रसंगी बोलताना चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी दिली.

0 Comments