Ticker

6/recent/ticker-posts

युवा नेते अभिषेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तारळे खुर्द गावामध्ये विविध वस्तुचे वाटप.


प्रतिनिधी: अमीर जमादार 
सध्या कोरोनाच्या काळात सुद्धा बरीचशी मंडळी मोठया प्रमाणात खर्च करून वाढदिवस साजरा करत आहेत. अशा वेळी तारळे खुर्द गावचे सुपुत्र अभिषेक पाटील यांनी याला फाटा देत आपल्या वाढदिवसानिमित्त  आपल्या गावातील गरीब-मजुर लोकांना 100 किलो गहू आणि 100 किलो तांदुळ याचे वाटप केले. तसेच  सामाजिक विषयासोबत  विज्ञानाची कस धरुन गावातील लोकांना मास्क देखील वाटप केले.समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने ही मदत देत असल्याचे अभिषेक पाटील यांनी या प्रसंगी सांगितले,तसेच आपल्या नातेवाईक,मित्रमंडळींना देखील या कामी मदत करण्याची विनंती केली.
सदर कार्यक्रमासाठी अभिषेक डोंगळे ,सुशील पाटील कौलवकर , दिंगबर येरुडकर, तारळे खुर्द गावचे सरपंच आनंदा पाटील,तसेच मानसिंग पाटील, वसंतराव पाटील, विश्वास पाटील, निलेश पाटील, अक्षय पाटील, प्रमोद पाटील,सर्जेराव पाटील,ओंकार पोतदार, विकास पाटील तसेच  हिंदवी स्वराज मित्र मंडळ व गावातील विविध मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments