Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट पासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार :-राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम

 पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट पासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार :-राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम


    राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नासंदर्भात केंद्र सरकार व राज्य शासनाकडे पत्रकार संघाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 ऑगस्टपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय विश्व गाणी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला आहे संतोष निकम हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्या प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील विंचूर निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघात विंचूर येथे निफाड तालुक्यातील अनेक पत्रकारांनी जाहीर प्रवेश केला पत्रकार सुनील शिरसागर मच्छिंद्र साळुंखे अनिल भावसार महेश साळुंखे अभय पाटील नंदू बागल युनूस पठाण रोहन सरोदे दत्तात्रेय दरेकर आदींसह निफाड तालुक्यातील अनेक पत्रकारांनी आपल्या समस्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे मांडल्या त्या सोडविण्यासाठी बहुउद्देशीय पत्रकार संघ प्रयत्न करणार असल्याचे संतोष निकम यांनी सांगितले.

    याप्रसंगी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख संतोष अहिरे प्रदेश संघटक विजय केदारे उत्तर महाराष्ट् अध्यक्ष रुपेश वराडे नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे समाज कार्य संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण डांगळे ह्युमन राईट्स संघ जिल्हा उपाध्यक्ष देविदास इंगळे जिल्हा प्रवक्ते राजेंद्र अहिरे राष्ट्रीय विश्वगामी निफाड तालुका महिला संघ उपाध्यक्षा चंद्रकला केदारे राष्ट्रीय विश्वगामी विद्यार्थी संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष हिमेश पगारे आदी उपस्थित होते.

   या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की राज्यात पत्रकारांच्या सेवेसाठी विश्वगामी पत्रकार संघ वर्षातील 365 दिवस व दिवसातील चोवीस तास कार्यरत आहे पत्रकार व्यक्ती आपल्या संघात असो किंवा नसो परंतु अडचणीच्या वेळेस विश्वगमी पत्रकार संघ कायम त्यांच्या पाठीशी असेल असे मत व्यक्त केले

उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले सोमनाथ मानकर यांची नाशिक जिल्हा उपसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रास्ताविक सूत्रसंचालन नाशिक जिल्हा अध्यक्ष यांनी तर आभार प्रदर्शन सोमनाथ मानकर यांनी केले यावेळी निफाड तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments