Ticker

6/recent/ticker-posts

मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील ३३% आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ रिपाइंची जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने*

 *मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील ३३% आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ रिपाइंची जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने* 

कोल्हापूर दि. १ जून२१



          रिपब्लिकन पार्टी अॅाफ इंडिया (आठवले), कोल्हापूर च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मागासवर्गीय शासकीय नोकरदारांच्या बढत्या मधील आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य शासनाने जारी केलेला ७ मे २०२१ रोजी चा, आरक्शण रद्दचा आदेश तात्काळ मागे घ्यावा तसेच दरम्यानच्या काळातील पदोन्नत्या होणार नाहीत आणि न्यायालयाचा सन्मान होईल असे धोरण घ्यावे, या मागणीकरिता तीव्र निदर्शने करण्यात आली. आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे आणि तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणे हा मागासवर्गीय कर्मचार्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे सदरचा जी.आर. रद्द करुन पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

        आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लीकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर व जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी केले.

        सकाळी साडे दहा पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेते, कार्यकर्ते जमण्यास सुरवात झाली. पोलीसांनी रिपब्लीकन पक्षाचा आंदोलनाचा ताफा अडवला, या ठिकाणी तीव्र घोषणाबाजी करुन आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला व नेत्यांची समयोचित भाषणे झाली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करुन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी जिल्हाधिकारी यांच्या वतीने श्री. कणसे साहेब यांनी निवेदन स्वीकारले. 


       हे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय महामहीम भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पाठवावे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. जिल्हाप्रशासनाने ही भूमिका मान्य करून, या भावना राज्यशासनाला पोहचवण्याचे आश्वासन दिले. 

    या मागण्या मान्य झाल्या नाहित तर यापुढे रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आपली भूमिका मांडणार, असा इशारा शिष्टमंडळाने यावेळी प्रशासनास दिला.

     यावेळी प्रदेश सचिव मंगळ माळगे साहेब, पश्चिम महा. सचिव रूपाताई वायदंडे, पश्चिम महा. उपाध्यक्श कुमार कांबळे साहेब, जिल्हा उपाध्यक्श दीपक भोसले, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, युवक आघाडी अध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, कागल तालुका अध्यक्ष बाबासो कागलकर, शिरोळ तालुका अध्यक्ष जयपाल कांबळे, शाहुवाडी अध्यक्ष विश्वास सरुडकर, गगनबावडा तालुका तानाजी कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश अबंपकर, पन्हाळा तालुका अमर कदम, शहर कार्याध्यक्ष राहुल कांबळे, शहर अध्यक्श सुखदेव बुध्याळकर, शहर युवा अध्यक्ष किरण निकाळजे, शहर कामगार आघाडी अध्यक्ष प्रदीप मस्के, सागर जमणे, अमर कांबळे, रमेश कांबळे, प्रज्योत सुर्यवंशी, अरुण दबडे प्रताप बाबर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments