कोविड काळजी केंद्र राधानगरी येथे अंडी व बिस्कीटपुड्यांचे वाटप
सागर कांबळे सर (कावणे प्रतिनिधी)
कोल्हापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.कोरोनाग्रस्त मृत्यूचा दरसुध्दा देशामध्ये जास्त आहे.प्रशासन तसेच डॉक्टर मेडिकल विभागाशी संबधित सर्वच लोक आपापल्यापरीने जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
आताच्या या भयावह परिस्थितीमध्ये आपल्यामधील अनेक लोक सामाजिक मदतीच्या भावनेने अनेक प्रकारची मदत करत असतात.अशीच मदत आज दिनांक 20 मे 2021रोजी कोविड काळजी केंद्र राधानगरी येथेरुग्णासाठी अंडी व बिस्किटे देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. ही मदत तरसंबळे व तारळे खुर्द येथील युवकांनी केली. ,याप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते उदय कांबळे(तरसंबळे),रत्नाकर कांबळे(कोल्हापूर),धनाजी कांबळे, अजित कांबळे, युवराज पाटील नवनाथ कांबळे, आशिष पाटील, करणसिंह कांबळे (तारळे खुर्द) तसेच सिद्धी पाटणे फॅन्स क्लब तारळे खुर्द मधील युवक उपस्थित होते.ही मदत स्वीकारताना कोविड काळजी केंद्रातील डॉक्टर मयूर पाटील, डॉ. आर.शेटे महेंद्र टिपूगडे सर, सर्व स्टाफ आदी उपस्थित होते.

0 Comments