हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून प्रचार, प्रसिद्धीसाठी ठोस पावली उचलली जात आहे. यातील उपाय म्हणून एरंडाचे आमिष सापळे प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यासाठी प्रोत्साहान दिले जात आहे. या सापळ्याचा वापर कसे करावे याची माहिती मुसळवाडी शिरगाव राशिवडे खुर्द पुंगाव परिसरातील काही गावांमध्ये कृषी विभागाचे कृषी सहाय्यक राहुल चौगुले यांनी प्रयोग घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतीकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. परिसरात दिवसेंदिवस बागायती क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र उसाची उत्पादकता चांगली जरी असली तरी त्यामागे बरीच कारणे असून यामध्ये हुमणी कीड-रोगांचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे.उसावरील किडीमध्ये प्रामुख्याने जास्त हानिकारक हुमणी कीड आहे. या हानीकारक किडीमुळे उसाच्या शेतीची पूर्ण क्षेत्र नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ते रोखण्यासाठी एरंडी आमिष सापळ्याचे मिश्रण तयार करण्यासाठी एरंडीचे चूर्ण चार लिटर पाण्यात घालून त्यात दोन ग्लास ताक घालून हे मिश्रण 48 ते 72 तास आंबवण्यासाठी ठेवावे.
त्यानंतर हे आंबवलेले मिश्रण घेऊन चार ते पाच मडक्यात अथवा पसरट भांड्यात जमिनीखाली पुरून ठेवावे. दोन ते तीन ग्लास पाणी मिश्रण करून याप्रमाणे वापर ह्या जमिनीमध्ये ठेवलेल्या द्रावणाच्या वासामुळे भुंगे जमा होतात. हे जमा झालेले भुंगे मोठ्या पसरट भांड्यात रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नायनाट करता येणार आहे.जमिनीत पुरलेल्या भांड्यावर लिंब, चिंच पानांची झावळ ठेवल्यास आणि प्रकाश सापळा लावून ठेवल्यास भुंग्यावर नियंत्रण मिळविण्यास यश आल्यानंतर हुमणीवर पूर्णपणे मिळवता येणार आहे. यावेळी उपस्थित मुसळवाडी शिरगाव राशिवडे खुर्द पुंगाव गावांचे ग्रामस्त उपस्थित होते .
0 Comments