Ticker

6/recent/ticker-posts

भोगावती परिसरात वळीव पावसाने उन्हाळी पिके धोक्यात

भोगावती परिसरात वळीव पावसाने उन्हाळी पिके धोक्यात

संदीप कलिकते 
(कौलव प्रतिनिधी )

   भोगावती परिसरात गेले कित्येक दिवस सुरु असलेल्या वळीव पावसाने  कापायला आलेले भात आणि काढणीस आलेले भुईमुग , सोयाबीन जमीनदोस्त होवून त्यांना कोंबरी फुटले आहेत
  दोन वर्षापूर्वी आलेल्या महापूरामुळे शेतकरी वर्ग अडचणीत होता तोपर्यंत गेल्या वर्षी अचानकपणे आलेला कोरोना सारख्या महारोगामुळे लाॕकडाऊनला सामोरे जावे लागले होते त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होवुन शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला होता गेले चार महीने शासनाने मुबा दिल्याने शिथीलता मिळली होती त्यातुन बाहेर पडण्या साठी शेतकरी वर्ग प्रयत्न करत होता  अशातच पुन्हा  कोरोना रोगाने डोके वर काढल्याने गेले एक महीना  शासनाने पुन्हा लाॕकडाऊन केल्याने जीव मेटूकुटीला आला  आहे अशातच गेले कित्येक दिवस वारंवार लागणाऱ्या वळीव पावसाने कापायला आलेले भात आणि काढणीस आलेले भुईमुग ,सोयाबीन जमीनदोस्त होवुन यांना कोंबरी फुटू लागले आहेत यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे तरी  यांचे शासनाने त्वरीत पंचनामे करुन आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होवु लागली आहे .

Post a Comment

0 Comments