Ticker

6/recent/ticker-posts

माणसाला नियतीने मारलेला जबरदस्त फटका म्हणजे कोरोना*

*सचिन पाटील सर*(संग्रहित )

 . माणुसकी ,स्वच्छता निस्वार्थीपणा, कुटुंब व्यवस्था पैशांचा दुरुपयोग , विलासी पणा ,ऐषारामी जीवन, आता या हरामाच्या पैशाचे काय करायचे? म्हणून विनाकारण केले जाणारे प्रवास, देवस्थानांचा वाढलेले प्रस्थ, श्रीमंती, मौजमजा , उद्धटपणा ,सत्तालोलुपता मग्रुरी, गुंडगिरी ,जगण्याचा अर्थ , मरणाची भीती, केलेल्या वाईट कृत्यांची आठवण, समारंभात केलेला पैशांचा अपव्यय, समारंभात जेवणाच्या वेळी पूर्ण पक्वणानी भरलेल्या ताटातील एक दोन घास खाऊन निर्लज्जपणे बाकीचे तसेच ठेवून ताटावरून उठून जाण्याची वाढती प्रवृत्ती, तसेच निकृष्ट जिवनशैली अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे . पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं. त्याला काय होते? असा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच फटका आहे. सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळूहळू उदयास आली होती .कधीतरी वाटेल तेव्हा अंथरुणातून उठून शॉवर खाली दोन मिनिटे उभारणाऱ्या पिढीला आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागतात . घरात कापूर, उदबत्ती, देवापुढे दिवा या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेचा सोयीस्कर नावाने फाटा दिला गेला आहे .आता ह्याच कापरासाठी मॉलमध्ये लाईन लागली , संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेले रामरक्षा ही वरदान ठरतेय. घरी आल्यावर अधि पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून, बुटा सकट बेडवर झोपून पायमोजे काढून भिरकावनारे आता चांगलेच पोळले गेले आहेत. धुप, दीप, नैवैद्य आधी मूळ प्रसन्न होणारे घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झाले . पुण्या, मुंबईसारख्या ठिकाणी तर घरचं जेवण लोक हळू विसरत चालले होते.आता त्यांची नितांत गरज भासतेय. उठलं की सुटलं ,प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं . त्यावर पण आता थोडा आळा बसला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्काराची दिलेली तिलांजली ,आता आपल्याच बोकांडी बसलीय. सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळपणा आहे. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलेय. शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच .रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आणि मोठ्या गाडीतून फिरणाऱ्या श्रीमंताला "मास्क" बांधून फिरायची वेळ आलीया. हे मानवा तू कितीही पुढारलेला असलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरुकिल्ली फक्त त्याकडेच आहे त्यामुळे त्याच स्मरण कर. जैन मुलीने तोंडावर मास्क घातल्यावर हसणारे आपणच आता आपण तरी काही वेगळे करत आहोत .आपण सुद्धा तेच करत आहोत. आपल्या सर्वांचा उद्देश बेवारस कुत्ते की मौत रस्त्यावर मरून पडलेल्या घुशी आणि उंदरासारखीे झाली आहे.आणि ही अवस्था द यायची नसेल तर सुसंस्कृतपणाचे तारतम्य भान ठेवून विवेकशील, तत्वशिल आणि सत्वशील असं जीवन असावे हाच खरा त्यामागचा उद्देश आहे . पुराण ,ग्रंथ यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्या येईल. अन्यथा वडापाव बर्गर सारख्या पिढीला असे किती तरी दर चार-पाच वर्षांनी असे कोरोना झेलावे लागतील. त्यासाठी हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव ,जगातील सर्व संकट टाळून सर्वांना उदंड आयुष्य दे , सर्वांचं भलं कर, कल्याण कर , रक्षण कर आणि तुझे गोड बोल सर्वांच्या मुखात अखंड राहू दे हीच प्रार्थना. 

Post a Comment

0 Comments