Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.विनायक पारळे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान. मराठीचा झेंडाअटकेपार

 डॉ.विनायक पारळे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान. मराठीचा झेंडाअटकेपार

 भुदरगड प्रतिनिधी
बाळासाहेब बोडके

एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात दक्षिण कोरियाच्या विद्यापीठाचे रिसर्च प्रोफेसर डॉक्टर विनायक पारळे यांना जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे. सायंटिफिक इंडेक्स मार्फत जगातील नामांकित शास्त्रज्ञांची यादी गुगल स्कॉलर्स आधार घेऊन दरवर्षी जाहीर केले जाते .यामध्ये शोधनिबंध आहे तसेच संशोधन संबंधित व्हिवर तसेच एडिटर म्हणून केलेले सर्व कार्य इत्यादींच्या साह्याने ही क्रमवारी ठरवली जाते .गेल्याच महिन्यात डॉक्टर विनायक पराळे यांना सायन्स फादर या प्रतिष्ठित संस्थेकडून युवा शास्त्रज्ञ पुरस्काराने गौरवण्यात आले होते .डॉक्टर विनायक पराळे हे मूळचे मडिलगे बुद्रुक तालुका भुदरगड चे रहिवासी असून सध्या दक्षिण कोरियामधील नामवंत विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत .डॉक्टर विनायक पराळे यांनी संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे .ते सध्या एरोजेल आव्हानात्मक पदार्थावर पुढील संशोधन करीत असून त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर एच . एच. पार्क व टीमला पुढील संशोधनासाठी कोरियन गव्हर्मेंट कडून 100 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरियामध्ये पहिले मटेरियल रिसर्च सेंटर उभारले जात आहे डॉक्टर पा२ळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर वर्षा पारळे हे या रिसर्च सेंटरची सदस्य म्हणून काम पाहत आहेत. डॉक्टर पा२ळे हे दहा वर्षाहून अधिक काळ संशोधन क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी त्या व्यतिरिक्त सौर ऊर्जा, फोटोकॅटलिजिस, गॅस सेन्सिंग, इत्यादी क्षेत्रात त्याने अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्याचबरोबर ते एरोजेल पदार्थाचा डिलिव्हरीसाठी उपयोजनात्मक अभ्यास या विषयावर सुद्धा त्यांचे पुढील संशोधन युद्धपातळीवर चालू आहे. ! त्यांनी आतापर्यंत 60 हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व याचा संदर्भ जगभरातील अनेक संशोधकांनी आपल्या संशोधन निबंध साठी घेतला आहे. डॉक्टर पा२ळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मडिलगे तालुका भुदरगड येथे झालेले आहे . तसेच त्यांनी पदव्युत्तर व पीएचडी पर्यंतचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पूर्ण केले.  त्यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूट आर आय टी इत्यादी नामवंत संस्थेमध्ये अध्यापनाचे कार्य केले 2016साली ते पुढे पोस्ट डॉक्टरेट साठी दक्षिण कोरियामध्ये विद्यापीठात प्राध्यापक एच एच पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले सध्या तेथे रिसर्च प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. प्राध्यापक पारवे यांचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर पण प्रेरणादायी असा राहिला आहे .डॉक्टर पारळे हे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यास तत्पर असतात सामाजिक उपक्रमात देखील ते सक्रिय असतात मग ते महापूर असो वा को२ोना अशा कठीण समयी परदेशातून मुख्यमंत्री सहायता फंडात मदत करून आपले उत्तरदायित्व दाखवले होते. परदेशात राहून देखील त्यांनी तेथे आपली संस्कृती जपत मराठा मंडळ स्थापित करून यामार्फत भारतीय सण साजरे केले जातात ते अमेरिकन केमिकल सोसायटी सोसायटी ऑफ केमिस्ट्री 50 हून अधिक नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यापैकी अनेक जणांनी त्यांना उत्कृष्ट विव्हर म्हणून गौरवले आहे डॉक्टर पारळे हे सध्या एम डी पी आय च्या नामवंत पॉलीमर्स चॅनलचे एडिटर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये तज्ञ म्हणून आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्याने दिली आहेत .l त्यांनी आजवर 100 हून अधिक कार्यशाळा प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत त्यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments