Ticker

6/recent/ticker-posts

रेमडीसीवर इंजेक्शन चोरी हेच कोल्हापूर मधील कोरोना बाधितांच्या वाढत्या मूत्युदराचे कारण आहे का?? ..... रुपाताई वायदंडे यांचा सवाल.

 *रेमडीसीवर इंजेक्शन चोरी हेच कोल्हापूर मधील कोरोना बाधितांच्या वाढत्या मूत्युदराचे कारण आहे का?? ..... रुपाताई वायदंडे यांचा सवाल*


*स्त्री जातीला कलंक असणाऱ्या रेमेडीसीवर चोर मनीषा रोटे हिचे वकीलपत्र घेऊ नये.*

*मनीषा रोटे व टोळीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!.... रिपब्लिकन पक्षाची मागणी*

 

कोल्हापूर दि. 17 मे2021

 

      कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असताना, जिल्ह्यातील वाढत्या मृत्युंचे कारण रेमडीसीवर इंजेक्शन चोरी हे तर नाहि ना? असा खडा सवाल रिपब्लीकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव रुपाताई वायदंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला. उद्यमनगर येथील हॅास्पीटल मधे काम करणार्या सूत्रधार मनीषा रोटे या महिलेसह टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर, जिल्ह्यातील इतर हि हॅास्पिटलमधे अशा पद्धतीच्या टोळ्या कार्यरत आहेत का? आणि तेच वाढत्या मृत्युदराचे कारण आहे का? असा एक गंभीर प्रश्न आज जाणवत आहे. याचा तपास पोलीस यंत्रणेने जलदगतीने करणे आवश्यक आहे असे मत रुपाताई वायदंडे यांनी व्यक्त केले.

    तसेच कोरोना बाधित रुग्णांसाठी संजीवनी असणाऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनची चोरी करून जाणीवपूर्वक लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कागल स्थित मनीषा तानाजी रोटे हिचे वकीलपत्र कोणत्याही वकिलांनी घेऊ नये असे आवाहन कोल्हापूर बार असोसिएशन व सर्वच वकिलांना रूपाताई वायदंडे यांनी केले आहे.

     रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट यापूर्वीही पोलीस प्रशासनाने उघडकीस आणले आहे. परंतु नुकत्याच उद्यमनगर मधील हॉस्पिटलमध्ये रेमडीसिवर चोरीप्रकरणी एक महिलाच प्रमुख सूत्रधार असणे हे मन सुन्न करणारे आहे. स्त्री हा मायेचा अथांग सागर असे प्रचलित असताना एका स्त्री कडून घडत असलेले हे अमानुष कृत्य म्हणजे समस्त स्त्री जातीला कलंक आहे. उद्यम नगर येथील हॉस्पिटलमध्ये कोव्हीड सेंटरची जबाबदारी सांभाळणाऱ्या मनीषा रोटे नावाच्या महिलेने, मृत्यूशय्येवरील कोरोना बाधित रुग्णांना रेमेडीसीवर इंजेक्शनची योग्य मात्रा न देता इंजेक्शन केल्याचे भासवून ते इंजेक्शन काळ्या बाजारात विकण्यासाठी चोरणे म्हणजे ही निव्वळ चोरी नसून जाणुन बुजुन केलेला हत्येचा प्रयत्न आहे आणि हा हत्येचा प्रयत्न पुन्हा पुन्हा, वारंवार वेगवेगळ्या आणि अनेक लोकांच्या वर केला आहे. म्हणूनच मनीषा रोटे या खूनी महिलेचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये असे आवाहन वायदंडे यांनीआज प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

      अत्यवस्थ असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांसाठी रेमडीसीवर इंजेक्शन हे वरदान आहे. आपला माणूस जगला पाहिजे आणि रेमडीसीवर इंजेक्शन दिल्यावर तो जगणारच अश्या प्रचंड मोठ्या विश्वासावर रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शन साठी बेहाल फिरत आहेत. वशिला शोधताहेत, विनंती करत आहेत, याचना करत आहेत, व्याजाने कर्ज काढत आहेत, गाडी-घोडे गहाण ठेवत आहेत पण हे इंजेक्शन मिळवून हॉस्पिटल प्रशासनास विश्वासाने सुपूर्द करत आहेत, आणि पेशंटच्या प्रकृतीत सुधारणेच्या निरोपाची वाट बघत दवाखान्याच्या बाहेर झाडाखाली बसत आहेत. परंतु मनीषा रोटे सारख्या बाईच्या रूपाने खरे यमदूत तर दवाखान्याच्या आतच आहेत. लोकांच्या जीवाशी, पैशाशी, वेळेशी, भावनांशी अमानवी पद्धतीने खेळणाऱ्या अशा नरसंहारक प्रवृत्तीला वेळीच ठेचणे गरजेचे असल्याने अशा खुन्यांना बाहेर सोडणे म्हणजे भविष्यात आपल्याच एखाद्या नातेवाईकाच्या किंवा स्वतःच्या सुद्धा जीवावर उठणे असे होऊ शकते. त्यामुळे मनीषा रोटे हिचे वकीलपत्र घेवू नये तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असेहि वायदंडे म्हणाल्या.

      या रॅकेटचा मुळाशी जाऊन याचा छडा लावावा व कोल्हापुरात कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्युदराचे कारण रेमडीसीवर इंजेक्शनची चोरी हेच आहे का हे तपासावे? कोरोनाने मृत रुग्णांचे डेथ अॅाडिट करावे तसेच इथून पुढे प्रत्येक रुग्णालयांकडून रेमेडीसीवर इंजेक्शन वापराच्या पद्धतीमध्ये पारदर्शकता आणून हॉस्पिटल स्टाफच्या हातात हे इंजेक्शन सुपूर्द न करता तज्ञ डॉक्टरांनी सीसीटीव्हीच्या निगराणीत हे इंजेक्शन रुग्णांना वापरावे अशी मागणीही रिपब्लीकन पार्टी अॅाफ इंडिया (आठवले) च्या वतीने या पत्रकाद्वारे यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments