Ticker

6/recent/ticker-posts

*म्हाकवे येथील स्वयंसेवा फाऊंडेशन संचलित कोरोना केअर सेंटरला जिल्हा परिषद सदस्य व माजी शिक्षण सभापती मा. अमरिषसिंह घाटगे यांची सदिच्छा भेट*

 श्री सचिन पाटील सर ( खिंडी व्हरवडे प्रतिनिधी)

म्हाकवे गावातील दानशूर व्यक्तींच्या अमूल्य देणगीतून येथील स्वयंसेवा फाऊंडेशन संचलित कोरोना केअर सेंटरला जिल्हा परिषद सदस्य व माजी शिक्षण सभापती मा. अमरिषसिंह घाटगे यांनी सदिच्छा भेट दिली आणि कोरोना सेंटरसाठी पी पी ई किट, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सी मिटर इत्यादी वैद्यकीय साहित्याची मदत केली. या वेळी महादेव चौगुले, धनंजय पाटील,शिक्षक नेते सुनील पाटील सर ,पोलीस पाटील अमित पाटील ,नितीन पाटील, विश्वनाथ पाटील काकासाहेब सावडकर, बाळासो रोडे ,आरोग्य सेविका नम्रता दाभाडे ,आरोग्य सेवक प्रतीक कुंभार व स्वयंसेवक उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments