भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या ३० व्या पुण्यतिथी निमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे तसेच जिल्हा युवक काँग्रेसचे संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने गरजू लोकांना जिवनावश्यक रेशन किट तसेच विलगीकरण असणाऱ्या लोकांना कोरोना किट चे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेस चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई व चंदगडचे पोलीस निरीक्षक पी.ए.तळेकर यांच्या प्रमुख हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.
0 Comments