Ticker

6/recent/ticker-posts

कावणे व परिसरातून कोल्हापूर स्मशानभूमीसाठी शेणी,लाकडे दान

कावणे व परिसरातून कोल्हापूर  स्मशानभूमीसाठी शेणी,लाकडे दान

सागर कांबळे 
(कावणे प्रतिनिधी)

गंगेच्या पवित्र नदीतून तब्बल दोन हजार मृतदेह बाहेर काढले.उत्तर प्रदेशातील 27 जिल्ह्यातून हे मृतदेह वाहून आलेत.बहुतांश मृतदेह हे कोरोनाग्रस्तांचे होते. आप्तांला मोक्ष मिळेल या आधार नसलेल्या भावनेतून अनेक मृतदेह गंगेत सोडले जातात. तसेच बरीच कुटुंबे अंत्यसंस्कारा साठी पैसे नाहीत म्हणूनही गंगेत सोडले जातात.मात्र आपल्या कोल्हापूरात अनेक वर्षांपासून विनामोबदला मृतदेहावर अंत्य संस्कार केले जातात.मात्र कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे कोल्हापूरात मृत्यूचा आकडा वाढत आहे.या मृत व्यक्तींचे अंत्य संस्कार व्यवस्थित होण्यासाठी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटीलसो आणिआमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या शेणी संकलन आवाहना नुसार करवीर तालुक्यातील कावणे गावातील युवावर्गाने स्वयंस्फूर्तीने कोल्हापूर येथील स्मशानभूमीसाठी एक हजार शेणी व पाच टन लाकडे जमा केलीत. 
              यासाठी कावणे येथील समाजकार्यात अग्रभागी 
असणारे गणेश कांबळे,अजित ढगे,विकास कांबळे,महेश परीट, जयवंत घाटगे,शहाजी कुंभार, ज्ञानदेव कांबळे,दिनकर पाटील, आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments