Ticker

6/recent/ticker-posts

लॉक डाऊन तर कराल बाकीचे प्रश्न कसे सोडवाल ?

 कोरोना संकटकाळी झालेल्या निवडणुका आणि त्या नंतर करण्यात येत असलेला  कडक ७ दिवसाचा लॉक डाऊन  . यामुळे सोशल मीडियावर काहींनी
 सकारत्मक तर काहींनी नकारत्मक सूर  काढला आहे त्या संदर्भात जाणून घेतलेल्या व्यक्ती प्रतिक्रिया पाहुयात .

सागर शिवाजी घोलप(युवा जिल्हा अध्यक्ष भारतीय दलित महासंघ)

कोरोनाचा संसर्ग एवढा फैलावत चाललाय आहे मग यांना कशाला निवडणुका लागतात? याचा आपण विचार केलाय का कधी ? निवडणुकांची सभेची गर्दी,  निवडणुकांच्या निकालानंतरची मिरवणुका सर्वकाही प्रशासनास चालते ,पण सर्वसामान्य माणूस स्वतच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी चालूही शकत नाही. आपण याचा कधी विचार केलाय?
इर्शा करायची तर चांगल्या गोष्टीची करा. 

कोल्हापुरात लसीचा तुटवडा आहे कोल्हापुरात शंभर टक्के लसीकरण करायचे हे कधी ?
असे अनेक प्रश्न कोल्हापुरात प्रलंबित आहेत, त्याबद्दलही विचार करून त्यासाठी काहीतरी लवकरात लवकर ठरवा म्हणजे झालं .


*23 मार्च 2020, एक वर्षापेक्षा जास्त दिवस होऊन गेले, तरीही अजून लॉकडाऊनवर लॉकडाऊन आणखी किती दिवस?.*
        *या लॉकडाऊनने आज जनता खरोखर मेटाकुटीला आली आहे. रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांना आता उपाशी मरण्यावाचून पर्यायच नाही.*
        *कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर या लोकांचं काय ?. आज युवावर्ग  बेजबाबदार झाला आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला जसाच्या तसा शेतात कुजून चालला आहे. या लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी आणि मोलमजुरी करणारे फळभाजी फेरीवाले यांचे काय हाल होणार आहे याचा विचार केला आहे का ?.*
        *आधी सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करा आणि मगच महाराष्ट्रा पुन्हा लॉकडाऊन करा. नाहीतर जनता घरी उपासमारीने मरण्यापेक्षा रस्त्यावर उतरून मरणे पसंत करील.*
         *वर्षभर जनतेच्या सहकार्याने आटोक्यात आलेला कोरोना आणखी कसा पसरला याची शहानिशा करा आणि याला जबाबदार कोण हे ही सरकारने अंतर्मुख होऊन शोधावे.*

 *मच्छिंद्र कांबळे*
*अध्यक्ष - :- लोकराज्य जनरल कामगार संघटना सांगरुळ.*



 पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने नैसर्गिक , धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर , याच कोल्हापूर मधील नैसर्गिक व ऐतिहासिक विविधता या दोहोंना नटलेले पन्हाळा हे ठीकण , किल्ला व थंड हवेचे ठिकाण म्हणून दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला अवश्य भेट देतात , आणि याच पर्यटक आणि पर्यटनावर येथील व्यवसाय आधारित आहे . कारण पर्यटक हे स्थानिकांचे उत्पनाचे हे एक माध्यम आहे , जसे की पर्यटकाने या ठिकाणास भेट दिल्यावर गड फिरवून दाखवण्यास येथील गाईड सेवा , रिक्षा वाहतूक , तसेच पर्यटकांच्या जेवण व राहण्याच्या सोईसाठी  हॉटेल्स तसेच ताक, सरबत व झुणका-भाकर चे स्टोल्स , पर्यटकांच्या मनोरंजनासाठी असणारे फनी गेम्स अश्या कित्येक छोट्या मोठ्या उत्पनाचे साधन या ठिकाणच्या पर्यटनावर अवलंबून आहे , कारण ठराविक स्थानिक लोक सोडले तर बाकीच्यांना शेती नाही , आणि दुसरा रोजगाराचे मध्यम म्हणाल तर जिल्ह्याच्या ठिकानाशिवाय पर्याय नाही त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायावरच स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह चालू असतो , पण या कोरोना कालावधीत पर्यटन बंद असले कारणांमुळे येथील लोकांना आर्थिक अडचणींना मोठया प्रमाणत सामोरे जावे लागत आहे , गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे व त्याच्या आधीच्या वर्षी पन्हाळगडाचा मुख्य रस्ता खचल्यामुळे पर्यटकांची वर्दळ कमी झाल्याने याच्या फटका , येथील सर्वसामान्य लोकांना बसलेला दिसून येत आहे , आता उत्पनाचे साधन बंद असलेने येथील रोजगार करणाऱ्या लोकांसाठी शासनाने काहीतरी उपाय योजना कराव्यात अशी मागणी लोकांमधून होत असल्याचे दिसून येत आहे 
.......प्रदीप कांबळे -   एक व्यावसायिक


शाहू, फुले,आबेंडकर या थोर  महापुरुषांच्या  विचाराचे सरकार म्हणारे राज्य सरकार आज महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नांत उदासीनता दाखवत आहे. कोविड महामारी, लसीकरण, आँक्सीजन अभाव, रुग्णांना न मिळणारी आरोग्यसेवा, तसेच रुग्णांची होणारी लूट आणि आरक्षण या बाबतीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 

            फक्त लाँकडाऊन केल म्हणजे प्रश्न सुटत नाही तर त्यासाठी आवश्यक असणारी  उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच समाजातील सर्व घटकांनी नियमाचे पालन करून एकत्रितपणे या महामारीविरूद्ध लढणे गरजेचे आहे.आपल्या देशाच्या कणा असलेल्या शेतकरी वर्गासाठी ठोस उपाययोजना,  खते टंचाई, भरमसाठ खत दर वाढ याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे.
           

श्रीधर मारुती पाटील 
बेलवळे बु

           सरचिटणीस,
भारती  जनता पार्टी युवा मोर्च्या कागल तालूका .



नक्कीच व्यवसाय करणारा म्हणून वाईट प्रतिक्रिया देईन. पण नेते मनमानी करतात तर आम्ही पण करून नाही चालणार त्यामुळे आपण जे काय सांगतील ते ऐकुया अस वाटत. सर्व नेते मंडळी तयार आहे लस घेऊन, त्यामुळे त्यांना काहीही फरक पडणार नाही lockdown चा
अभिजीत विलास पाटील

 महामारीपेक्षा भूकमारीची जास्त चिंता वाटते.सरकारने तीन किलो गहू 2 किलो तांदूळ दिलं परंतु नुसता भात किंवा चपाती खाता येत नाही , बाकीच्या गोष्टी ही लागतात , तेल, चटणी , भाजी वगैरे हे सरकारने लक्षात घ्यायला हवे.
सरकारी , खाजगी अधिकाऱ्याचे पगार सुरू आहेत फक्त गरिबांची टपरी बंद आहे . त्याने कुटूंबाचा बाकीचा खर्च बचत गटांचे हप्ते, गाडी चे हप्ते, लाईटबिल , यासाठी पैसे कुठून आणायचे .....

दिनेश लक्ष्मण चोरगे


शासनाने लावलेले आत्तापर्यंतचा  लॉक डाऊनचा अनुभव पाहता लॉक डाऊनच्या नियमांमध्ये बदल अपेक्षित आहे.
      महेंद्र मनोहर कांबळे

Post a Comment

0 Comments