Ticker

6/recent/ticker-posts

थैलेसिमीया रुग्णांच्यासाठी औषधे होत आहेत उपलब्ध, रूग्णांची हेळसांड होणार कमी.

थैलेसिमीया रुग्णांच्यासाठी औषधे होत आहेत उपलब्ध, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, प.व.पा.शा.रू सांगली व समवेदना मेडिकल फौंडेशन यांचा पुढाकार, रूग्णांची हेळसांड होणार कमी.



बरकत पन्हाळकर
कोल्हापूर

  आज दिनांक 8/ 4 /2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज प.व.पा.शा. रू. सांगली व समवेदना मेडीकल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यासह लागून असलेल्या सिमा परिसरातील थॅलेसेमिया ग्रस्त मुलानां  आवश्यक असलेली चिलेटींग .औषधे वाटप करण्यात आली. सदर औषधे वारंवार रक्त चढवावे लागणाऱ्या थैलेसीमिया ग्रस्तानां कायम स्वरूपी देणे गरजेचे असते ही औषधे न दिल्यास रुग्णांमध्ये लोहाच्या प्रमाणात वाढ होवून शरीरावर अघटित परिणाम होतात, त्यामुळे शरीरामधील विविध अवयवांवर अनिष्ट परिणाम होवून अनेक अवयव निकामी होण्याच्या प्रमाणात वाढ होते त्याच बरोबर हाडे ठीसुळ होतात ते टाळण्याकरिता डेसीरॉक्स, केल्फर, हायड्रॉक्सयुरिया,कॅलशिअम,फॉलिकअॅसिड गोळया ,सिरप व डेस्फ्राल इंजेक्शन देणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे फेरीटीन हा घटक रक्तामध्ये वाढ होण्या पासून टळू शकते. 
  कोविड साथी दरम्यान अशी औषधे उपलब्ध होणे अत्यंत अवघड होते तसेच सांगली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये आजतागायत अशी औषधे नियमितपणे उपलब्ध नसल्याने सर्व थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांची गैरसोय होत होती. तथापि समवेदना मेडीकल फाउंडेशन चे अध्यक्ष बरकत पन्हाळकर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे व मिरज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी समन्वय साधून डेसीरॉक्स, केल्फर ही औषधे तात्काळ उपलब्ध करून रुग्णांनां वाटप करण्यात आले. 
  ही औषधे उपलब्ध होत असल्याने थैलेसिमीया ग्रस्तांची सोय होत आहे त्यामुळे सांगली जिल्हयातील या मुलांच्या पालकांना औषधासाठी सातारा, कोल्हापूर येथे जावे लागणार नाही. सांगली सिव्हीलमध्ये ही औषधे उपलब्ध होत असल्याने घेवून जावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ.सुधीर ननंदकर, सिव्हील सर्जन डॉ. संजय साळुंखे, डॉ.शिशिर मिरगुंडे व फौंडेशनचे अध्यक्ष बर्कत पन्हाळकर यांनी केले. याकरिता सांगली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकिशोर गायकवाड , उप अधीक्षक डॉक्टर सतीश अष्टेकर, उप वैद्यकिय अधिक्षक डॉ.रूपेश शिंदे, औषध शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रद्धा पोरे, नर्सिंग स्टाफ, पदव्युत्तर विद्यार्थी व फौंडेशनचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष रंजित पाटील, डॉ. विनायक मराळे, सद्याम ढालाईत, किशोर कांबळे,राजू कांबळे यांचे सहकार्य लाभले.
   रुग्णांच्या पालकांनी याबाबत समाधान व्यक्त करून रुग्णालया मार्फत नियमितपणे औषध पुरवठा केला जावा अशी आशा व्यक्त केली

Post a Comment

0 Comments