Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इब्राहिमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इब्राहिमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात साजरी

नारायण शिरोळकर
 (चंदगड प्रतिनीधी )

     इब्राहिमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. कोरोनाचा राज्यातील वाढता प्रभाव पाहता, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या. गेल्या वर्षीही आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यंदाही तशी साजरी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते त्यानुसार इब्राहिमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार जयंती साजरी केली गेली. याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देत सरपंच निळकंठ देसाई तसेच उपसरपंच तुकाराम हरेर आणि सदस्यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
    इब्राहिमपूर तालुका संघाचे व्यवस्थापक सदानंद कांबळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरीक दिनकर देसाई, सरपंच निळकंठ देसाई, उपसरपंच तुकाराम हरेर, ग्रामसेवक आशा घुगे यांच्यासह सदस्य गणपती पानोरे,जयश्री सुफल, ग्रामपंचायत कर्मचारी अंनत कदम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments