नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनीधी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एखदा कोल्हापूर जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चंदगड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या पहाता राज्य शासनाने कानडेवाडी (ता.गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने कोविड सेंटरसाठी ताब्यात घेतल असून या आरोग्य केंद्रात २० खाटांची मान्यता देण्यात आली आहे.
याच पार्श्वभुमिवर शिवसेनेचे चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी केली तसेच प्रशासनास या कोविड सेंटरसाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासीत केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अथणी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैदयकीय अधिकारी डॉ.निलेश भारती, डॉ.भावना खांदवे, एस.डी.रणदिवे, डाॅ.एस.पी. कांबळे आणि केंद्राचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
0 Comments