Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या जन्मदिवसानिम्मित्त चंदगड काँग्रेसकडून रक्तदान शिबीराचे आयोजन .


नारायण शिरोळकर ( चंदगड प्रतिनीधी)
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचा वाढदिवस १२ एप्रिल रोजी साजरा होणारा वाढदिवस कोरोनाच्या वाढत्या परस्थितीमूळे होणार नसुन रक्तदान शिबीराचे आयोजन केले जावे असे अवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी 'मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा" असा संदेश दिला आहे.
कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सद्या कोल्हापूर जिल्ह्यातील रक्त पेढ्याकडे कमी प्रमाणात रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढिवच्या निम्मित्ताने चंदगड तालुका काँग्रेस कमिटी व टिम सतेज चंदगड यांच्या वतीने व्ही.के.चव्हाण पाटील कॉलेज पाटणे फाटा ( ता.चंदगड ) येथे सोमवार १२ एप्रिल रोजी सकाळी ठीक ९ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या वेळी  साहेबांच्या वाढदीवसानिमित्त मी स्वतः रक्तदान करणार आहे .आपण सर्वांनी सुद्धा रक्तदान करून वाढदिसानिमित्त शुभेच्छा देवून आपल्या महाराष्ट्रात जो रक्त तुटवडा निर्माण झाला आहे त्यात आपण जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन  राष्ट्रीय काँग्रेसचे चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर यांनी चंदगड तालुक्यातील जनतेला केले आहे.
याप्रसंगी बोलताना शिरोलीकर म्हणाले की, गेल्या एक-दीड महीन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्या मध्ये सध्या रक्त साठा कमी आहे. भविष्यात कुठेही रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी  पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात ठीक-ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने  रकदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत चंदगड तालुक्यात या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपण सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करावे व  पालकमंत्री सतेज पाटील साहेबांच्या या सामाजिक उपक्रमाला पाठबळ द्यावे असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर यांनी केले असून येणाऱ्या काळात सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गरज पडेल तशी रक्तदान शिबिरे संपूर्ण तालुक्यात राबविण्याचा मानस असल्याची माहिती याप्रसंगी बोलताना त्यांनी दिली.




      

Post a Comment

0 Comments