अलबादेवी-उस्ताळी ते अडकूर रस्ता पावसाळ्यापूर्वी तात्काळ पूर्ण करावा- श्रीकांत नेवगे
नारायण शिरोळकर.
*(चंदगड प्रतिनिधी)*
अलबादेवी ते उस्ताळी फाटा व अलबादेवी ते अडकुर हा दोन किलोमीटर अंतर असलेला रस्ता पावसाळ्यापूर्वी तत्काळ पुर्ण करावा अशी मागणी चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवगे व अलबादेवी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता सदानंद जाधव यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी बांधकाम सहाय्यक रजत हुलजी उपस्थितीत होते.
गेल्या महिन्यात साधारण तीन किलोमीटर अंतरावर डांबरीकरण झाले असुन ते अडकुर गावच्या बाजुने झालेले आहे. वास्तवीक पाहता अलबादेवी गावच्या बाजूचा रस्त्यांची अवस्था दैयनिय झाली आहे. त्यामूळे वाहतुक धोकायदायक बनली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमूळे अपघातला निमंत्रण मिळत आहे. या संदर्भात गेल्या तीन ते चार वर्षापासुन अलबादेवी ग्रामस्थांनी आंदोलन, उपोषण, त्याचबरोबर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी यांनी देखील मागील महिन्यात पंचायत समीती बांधकाम विभाग कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यामूळे प्राधान्य क्रमानुसार अलबादेवी ते अडकुर हा दोन किमी चा रस्ता व अलबादेवी ते उस्ताळी फाटा हा एक किमी अंतरचा रस्ता अग्रस्थानी घ्यावा व ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे श्रीकांत नेवगे यांनी केली आहे.
सदर निवेदन देते प्रसंगी श्रीकांत नेवगे, अलबादेवीचे उपसरपंच राजाराम पाडले, यशवंत घोळसे, परशराम चौकुळकर, सुभाष इंगवले,नामदेव नेवगे, मारुती डांगे उपस्थित होते.
0 Comments