Ticker

6/recent/ticker-posts

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रीय पक्षांची धुरा खांद्यावर घेतलेल्या मराठी तरूणांनी देखील एकत्र येण्याची गरज - भरमुआण्णा नांगनूरकर



चंदगड प्रतिनीधी :
नारायण शिरोळकर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रीय पक्षांची धुरा खांद्यावर घेतलेल्या मराठी तरूणांनी देखील एकत्र येण्याची गरज - भरमुआण्णा नांगनूरकर 


१७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडत आहे. दोन ताकतवर राष्ट्रीय पक्ष
आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यामध्येच खरी लढत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिलेला एक मराठी तरुण शुभम शेळके याने राष्ट्रीय पक्षांसमोर तगड आव्हान उभे केले आहे.या तरुणाने विखुरलेल्या मराठी माणसाला एकत्र येण्यासाठी एक आशेचा किरण दाखवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अस मत सीमा संघर्ष समितीचे सदस्य भरमुआण्णा नांगनूरकर यांनी व्यक्त केल आहे.
नांगनूरकर पुढे म्हणाले, लोकसभा पोटनिवडणूकीच्या माध्यमातून तरी वेगवेगळ्या चुला मांडलेला मराठी माणूस एकत्र यावा यासाठी राष्ट्रीय पक्षांची धुरा खांद्यावर घेतलेल्या मराठी माणसाने सुद्धा एकत्र यावं गेल्या अनेक वर्षात अत्याचार अन्याय सहन करत असलेल्या अनेक वर्षे खितपत पडलेला लढ्याला बळ द्यावं असाच हा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. सर्व अन्यायकारक शक्ती विरुद्ध महाराष्ट्र एकिकरण समिती अशी च ही निवडणूक आहे. वेळोवेळी आंदोलन मोर्चातून अन्याया-आत्याचाराविरुद्ध उभा ठाकणार हा तरुण मी पहिला आहे माध्यमांवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या उमेदवाराच्या विजयाने बरीच समीकरणे बदलणार आहेत हे सर्वात प्रथम मराठी माणसाने जाणून घेण्याची आवश्यकता असल्याच मत त्यांनी व्यक्त केल. पुढे नांगनूरकर म्हणाले, हिच ताकद तुम्हाला देशाला आणि देशाच्या पंतप्रधानांना दाखवावी लागेल की इथे मराठी आणि मराठीचा वावर आणि जागर आहे त्यामुळे हा प्रश्न मराठी माणसाच्या पदरात पडला पाहिजे.
काही मराठी जनता राष्ट्रीय पक्षांच्या जरी दावणीला बांधली गेली असली तरी आत्ता या निवडणुकीत मात्र त्यांना महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या उमेदवाराला पाठबळ द्यावच लागेल 
मराठी माणसांच्या दुकानावर कन्नड पाठीची सक्ती करण्यासाठी आलेल्या कन्नड गुंडांना दोन हात करण्यासाठी दाखवलेले धाडस या तरुणांमध्ये दिसते हे प्रामुख्याने मांडल्याशिवाय थांबता येत नाही सध्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे पैशाचे आमिष दाखवण्यात येईल गावच्या गाव विकत घेण्याचा प्रयत्नही होईल सर्वच गोष्टींचा अनुभव येईल पण प्रश्न उरतो तो प्रांत भाषावाद लढा आणि आपली भूमी ह्यात सर्व हक्काच्या गोष्टींसाठी
लढ्याच्या बाजूने सर्वांनी उभा राहणे गरजेचे आहे या पूर्वीचे बरेवाईट अनुभव असून सुद्धा यावेळी सर्वांनी शुभम शेळके सारख्या तरुण उमेदवाराच्या पाठीशी उभा राहून महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी माणसाच्या लढ्याला काटेखोर पणे विजयी करण्यासाठी कंबर कसली पाहिजे कारण ती काळाची गरज आहे निवडणुका येतात व निवडणुका जातात पण काही निवडणुका अस्तित्व दाखवण्यासाठी येतात त्यातलीच ही एक निवडणूक म्हणता येईल ही निवडणूक मराठी माणसाच्या पदरात पाडण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने कंबर कसली पाहिजे आणि जास्तीत जास्त बहुमताने या उमेदवाराला निवडून दिल पाहिजे अस परखड मत सीमा संघर्ष समीतीचे भरमुआण्णा नांगनूरकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील ६ ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तर २ ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वी याठिकाणी महाराष्ट्रात एकीकरण समितीचेच जास्त आमदार पाहायला मिळायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्हनगुत्ती प्रकरणासह बेळगाव महापालिकेसमोर लावण्यात आलेल्या वादग्रस्त झेंड्याच्या विरोधात मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या गाडीवरसुद्धा कन्नड संघटनांनी हल्ला केला होता. त्यानंतर सातत्याने या सीमाभागात वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बेळगाव लोकसभेच्या या पोटनिवडणुकीत नेमके काय होणार? मराठी भाषिक कोणाला मत देणार हेच पाहावे लागणार आहे. 

   

 

Post a Comment

0 Comments