प्रतिनिधी:
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा,
विसावा मंडळाचे रक्तदान शिबिर उत्साहात
लाॅकडाऊन असून 90 जणांनी केले रक्तदान
गावभागतील विसावा मंडळाच्या वतीने हुतात्मा बाबु गेनु स्मृतिप्रित्यर्थ 36 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते गत वर्षीच्या रक्तदान शिबिरात 101 जणांनी रक्तदान केले होते,तसेच सध्या महाराष्ट्रात व सांगलीत असलेला रक्ताचा प्रचंड प्रमाणात तुटवडा लक्षात घेऊन विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी पुन्हा रक्तदान शिबिर आयोजित करायचे ठरविले या रक्तदान शिबिरात लाॅकडाऊन असून देखील सामाजिक बांधिलकी जपत 90 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले,विसावा मंडळ गेले 36 वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवित आहे तसेच अत्यावश्यक वेळ प्रसंगी नागरिकांना रक्त पुरवित आहे,सदर शिबिरास कृष्णामाई जलतरण संस्था,कृष्णामाई स्वच्छता अभियान,सरकार ग्रुप यांचे सहकार्य लाभले. शिरगावकर ब्लड बँकेने रक्त संकलन केले.
याप्रसंगी आमदार सुधीर दादा गाडगीळ,भारतीय जनता पार्टीचे युवा नेते पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार,काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,सर्व पक्षीय कृती समितीचे सतिश साखळकर,मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटिल,ब्लड बँकेचे सचिव तिळवे,श्रृती कुलकर्णी,रामकृष्ण चितळे,गोपाळ मर्दा,हेमंत दिगडे व भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संयोजन अध्यक्ष संजय चव्हाण,भास्कर कुलकर्णी,सुहास चव्हाण,मिलिंद खाडिलकर,शिरीष चव्हाण,शुभम चव्हाण,प्रथमेश वैद्य,महेश खाडिलकर,अजिंक्य कुलकर्णी,समर्थ शेळके,श्रीराम चव्हाण,गणेश भोई,सोहम चव्हाण,नीरज चव्हाण,प्रथमेश पाटील,शार्दुल वसगडेकर,शुभम बापट,सोहम जोशी,यश कुलकर्णी,वृषभ वारद,नीरज वसगडेकर,निलम कुलकर्णी,सुयोग चिंदरकर यांनी केले.
0 Comments