Ticker

6/recent/ticker-posts

*कोल्हापूर जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती आयोजित "भिमहोत्सवाची" भिमजयंती दिनी, विविध उपक्रम आणि ऑनलाइन व्याख्यानमालेच्या पाचव्या पुष्पाने सांगता!*

*कोल्हापूर जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती आयोजित "भिमहोत्सवाची" भिमजयंती दिनी, विविध उपक्रम आणि ऑनलाइन व्याख्यानमालेच्या पाचव्या पुष्पाने सांगता!*

 कोल्हापूर दिनांक 14 एप्रिल/
           विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे दि. १४ एप्रिल भिमजयंती दिनी, सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते व व आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई, जिल्हापोलीस प्रमुख मा. शैलेश बलकवडे, मा. आयुक्त कादंबरी बलकवडे, मा. महापौर निलोफर आजरेकर, करवीर तहसीलदार मा. शितल मुळे भामरे तसेच आंबेडकरी पक्ष संघटनांच्या नेत्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॅा. शरद गायकवाड, रिपाइं जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख, रिपाइं पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे डी. जी. भास्कर, दिघे फाऊंडेशनचे सदानंद दिघे, एकतावादीचे जयसिंग जाधव, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संजय जिरगे, समितीचे कोषाध्यक्ष अनिल धनवडे, उपाध्यक्ष पांडुरंग कुरुकलीकर, प्रशांत अवघडे, सदस्य प्रवीण आजरेकर, दावीद भोरे, प्रताप बाबर यांच्यासह अनेक भिमसैनिक उपस्थित होते.
        दुपारी कुष्ठरोगधाम शेंडा पार्क येथील गरजूंना समितीचे अध्यक्ष प्रा. डॅा. शरद गायकवाड यांच्या संकल्पनेतून व समितीचे  मार्गदर्शक  प्रा. शहाजी कांबळे सर, रूपाताई वायदंडे, समितीचे कोषाध्यक्ष अनिल धनवडे, संजय जिरगे, प्रताप बाबर, समिती सदस्य बाजीराव गायकवाड, अशोक घाडगे, बटू भामटेकर, यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.
        त्यानंतर सिद्धार्थ नगर येथील  मध्यवर्ती जयंती सोहळ्यास प्रा. शहाजी कांबळे यांनि भेट देऊन बाबासाहेबांच्या विशाल पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी स्थानिक नागरिक माळी साहेब, विनोद कांबळे, सुशील कोल्हटकर, पत्रकार वसंत लिंगनूरकर, रिपब्लिकन पक्षाच्या रूपाताई वायदंडे, संजय जिरगे, प्रताप बाबर आदी उपस्थित होते.
         सायंकाळी ऑनलाईन व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफण्यात आले. यामध्ये *"फुले आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे"* या विषयावर रूपाताई वायदंडे यांनी मांडणी केली तर व्याख्याते प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे या विषयावर व्याख्यान झाले. 
        त्यानंतर अखेरच्या सत्रात इस्लामपूर येथील व्याख्याते डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी *"आधुनिक भारताचे निर्माते डॅा. बाबासाहेब आंबेडकर"* या विषयावर  व्याख्यानाचे पाचवे पुष्प गुंफले व व्याख्यानमालेची सांगता झाली.  
        यानंतर रिपाइं जिल्हाध्यक्श उत्तमदादा कांबळे यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले तर अनिल धनवडे यांनी आभार मानले. प्रा. शहाजी कांबळे यांनी पाचही व्याख्यानमालांचा अध्यक्षीय समारोप करून महोत्सवाची सांगता केली.
        व्याख्यानमाला पूर्ण करून रात्रीच्या सत्रात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांच्या संकल्पनेतून प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते, बिंदू चौकात महामानवास अभिवादन करणार करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींना, पत्रकारांना तसेच पोलीस बंधू-भगिनींना मास्क चे वाटप करण्यात आले. त्यानंतर संपादक वैभव प्रधान यांच्या समाजक्रांती या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांच्या हस्ते ऐतिहासिक बिंदू चौक येथे प्रकाशन करून भीम जयंती दिवशी आयोजित केलेले कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments