Ticker

6/recent/ticker-posts

शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना अभिवादन

शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना अभिवादन

कागल प्रतिनिधी
विजय कांबळे

कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कारखाना प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे,शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व कारखान्या च्या संचालिका सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्व. घाटगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची खबरदारी घेत हा स्मृतिदिन मोजक्या सभासदांच्या कार्यकर्त्यांनच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा केला.तसेच
या स्मृतीदिनाचे औचित्य साधून कारखान्या मार्फतच्या रुग्णवाहिकेची पूजन करून ती आरोग्यसेवेसाठी दाखल करण्यात आली.

यावेळी माजी आमदारबाबासाहेब पाटील सरुडकर,कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाहू साखर कारखान्याचे सर्व संचालक, राजे बॅंकेचे चेअरमन एम.पी.पाटील, व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर,शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस, व्हाईस चेअरमन अरुण शिंत्रे, शाहू दूध संघाचे सर्व संचालक, शाहू ग्रुप मधील विविध संस्थाचे पदाधिकारी व सभासद शेतकरी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments