सांगली प्रतिनिधी,
प्रमोद चिनके.
सांगली मध्ये लॉक डाऊन च्या दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांचा आणि जनतेचा पूर्ण पाठींबा मिळाला .
सांगली मध्ये कोरोना वाढीमुळे फळ विक्रेते भाजी विक्रेते आणि इतर दुकाने या सर्वांनी आपापली दुकाने बंद ठेऊन बंदला पाठींबा दिला.
शहराच्या मध्यवर्ती असलेले सिव्हील चौक पूर्ण पणे बंद असून रस्त्यावर शांतता बघायला मिळाली रोज सिव्हिल चौकात गजबजलेल्या ठिकाणी पूर्ण पणे शांतता होती.
शहराच्या मुख्य म्हणजे पुष्पराज चौक या ठिकाणी मोठी वर्दळ असते पण कोरोना च्या वाढत्या संख्ये मूळे पुष्पराज चौक या रस्त्यावर पूर्णपणे मोकळीक होती. विश्रामबाग चौकातील पोलीस मुख्यालय जवळ तर पूर्ण पणे रस्त्यावर शांतता होती तरी काही नागरिक दिसत होते . या कोरोना मुळे असेच जर सुरू राहीले तर जनतेवर उपासमारीची वेळ येईल.
0 Comments