Ticker

6/recent/ticker-posts

चंदगड तालुक्यातील माणगाव येथे बाधंकाम कामगारांना सुरक्षा किट व आत्यावशक साहित्याचे वाटप

चंदगड तालुक्यातील माणगाव येथे बाधंकाम कामगारांना सुरक्षा किट व आत्यावशक साहित्याचे वाटप .
नारायण शिरोळकर :
 (चंदगड प्रतिनीधी)

चंदगड तालुक्यातील माणगाव येथे चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन यांच्या वतीने माणगाव मधील नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बाधंकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या कडून देण्यात येणाऱ्या योजना पैकी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी काम करताना व कामाच्या ठिकाणी राहाताना कोणतीही अडचण येऊ नये या साठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षासंच व आत्यावशक साहित्याचे वाटप कामगार अधिकारी एकनाथ गुरव ,अध्यक्ष कलाप्पा निवगीर, उपाध्यक्ष बाबू चौगले,सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.याप्रसंगी बोलताना कामगार असोशिएनचे चंदगड तालुका अध्यक्ष कलाप्पा निवगीर म्हणाले चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांनी चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन कडे नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन केले. यावेळी कामगार परसू नरी, शिवाजी तरवाळ, नारायण वरगावकर, सुरेश चिचंनगी, सुनील पिटूक, लक्ष्मण नाईक, राजू तरवाळ, मारूती नाईक, मारूती चिचंनगी, तुकाराम नरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments