Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा फुले यांना अभिवादन करून मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीने आयोजित केलेल्या भीम-महोत्सवास सुरुवात.


 कोल्हापूर दिनांक 11 एप्रिल.

         विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीने आयोजित केलेल्या भीम-महोत्सवास आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आरंभ झाला.
     ऐतिहासिक बिंदू चौक येथील राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्याला कोल्हापूर जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर, मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष डी.जी. भास्कर, रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
     या अभिवादन प्रसंगी, जयंती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील युगप्रवर्तक कार्याचे वर्णन केले.
       रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर यांनी "कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भिमजयंती चे नियोजन करण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष लक्ष घालावे" या मागणीसाठी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी महात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादनासाठी सकाळी बिंदू चौक येथे उपस्थित राहण्याचे आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या शिष्टमंडळास कबूल केले होते. परंतु कदाचित प्रशासनाला आपल्या आश्वासनाचा विसर पडला असावा अशी आठवण प्रा. कांबळे यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणातून केली. यानंतर लगेच प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई व ऍडिशनल एस. पी. तिरुपती काकडे हे बिंदू चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले.
     अभिवादन प्रसंगी रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाध्यक्श उत्तमदादा कांबळे, रूपा वायदंडे, डी. जी. भास्कर, दिगंबर लोहार, सुशील कोल्हटकर, आर के कांबळे, बाळासो भोसले, पी एस कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        अभिवादनासाठी प्रा. शहाजी कांबळे सर, प्रा. डॅा. शरद गायकवाड उत्तमदादा कांबळे, डी.जी. भास्कर, रूपाताई वायदंडे, दिगंबर लोहार, बाळासाहेब भोसले, सदानंद दिघे, तकदिर कांबळे, तुळशीदास थोरात, प्रदीप म्हस्के तसेच मध्यवर्ती जयंती समितीचे अनिल धनवडे, निलेश बनसोडे, पांडुरंग कुरूकलीकर, प्रवीण आजरेकर, आदि उपस्थित होते. 
*कोल्हापूर जिल्हा, डॅा. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती आयोजित अॅानलाईन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प संपन्न!*

         यावर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे शासनाचे सर्व नियम पाळून यंदाचा भीम उत्सव हा बौद्धिक उत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरले नुसार, आज सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत *डॅा. प्रमोद फरांदे* यांचे *महात्मा फुले यांची कामगार चळवळ आणि आजचे वास्तव* या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले.
       यावेळी आंबेडकरी समाज पक्ष संघटनेचे नेते प्रा. शहाजी कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे उत्तम दादा कांबळे, रिपब्लिकन पक्षाच्या रूपाताई वायदंडे, दिघे फाउंडेशन चे सदानंद दिघे, बहुजन परिवर्ततन पार्टिचे बाजीराव नाईक तसेच मध्यवर्ती जयंती समितीचे कोषाध्यक्श अनिल धनवडे, सचिव अविनाश शिंदे, उपाध्यक्ष पांडुरंग कुरूकलीकर, सदस्य प्रवीण आजरेकर, प्रदीप मस्के आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments