आज करवीर जि कोल्हापूर येथिल शिरोली ( दु.) येथील आरोग्य केंद्रात आज नाट्यमय घडामोडी घडल्या, येथील आरोग्य अधिकारी मा. मोरे सो आजारी असल्याने त्या वैद्यकीय रजा घेऊन आरोग्य केंद्रात उपस्तीत राहिल्याच नाहीत. पण तत्पूर्वी नँशनल ब्लॅक पँथर पार्टी चे महाराष्ट्र निरिक्षक जीवनसिंग यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तथा ग्रामसेवक शिरोली दूमाला येथे पूर्वीच सूचना दिल्याप्रमाणे संबंधित आरोग्य केंद्राला भेट देऊन घटनेची सखोल चौकशी करून परिचारिका, सहपरीचारिका तसेच कंत्राटी परिचरिकांची आणि त्यांच्या व्यथांची पूर्ण माहिती घेतली.
आरोग्य केंद्रातील कंत्राटी सेविकानी आरोग्य अधिकारी तसेच वरिष्ठ कर्मचारी यांच्यावर सरळ घनघोर आरोप केले आहेत कि वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पदाचा गैर वापर करून त्यांना सतत नाहक त्रास देतात तसेच अवमान कारक जातीवाचक बोलतात, आणि इतकेच नाही तर बेकायदेशीर ज्यादाची शिप्ट करण्यास बाध्य करतात, आणि जर नाहि ऐकले तर शासकीय निवासी खोली खाली करण्यास रात्री बे रात्री फोन करून दबाव आणतात तसेंच वरिष्ठ कर्मचारि महिला आपल्या मर्जित राहण्यासाठी दबाव आणतात विरोधात बोलल्यास आमदारांच्या कर्वि फोन करून धमकी देतात
असे आरोप केले होते.
या संधर्भात मागील दोन दिवसा पूर्वी उपस्तीत
मोरे अधिकारी याच्याशी संपर्क साधला असता कर्मचारी स्टाफ मनमानी करत आहे . स्वतः आपण वेळेत हजर असतो तरी काही कर्मचारी हजर नसतात मी केलेल्या सूचनाचे पालन कोणीहि करत नाही . कोरोना संकट पाहता सगळ्यांची जबदारी आहे कि आपण जबाबदारीने राहिले पाहिजे .
कोणास काही सूचना कराय गेले तर प्रत्येकजण आपापल्या लोकांना फोन करून मलाच त्रास देतात व प्रेशर आन्याचे कामं करतात .
खरं तर प्रत्येकजन मला समान असून मी प्रत्येकाला सोबत घेऊनच कामं करते कोणताही भेद भाव करत नाही .
काही वेळेला कर्मचारी वर्ग त्यांच्या सोई प्रमाणाने आपापसात बोलून घेऊन सुट्या घेतात आणि शिप्ट करतात .
मी स्वतः अधिकारी असून कोणत्याहि प्रकारे अपमान होईल असे वर्तन केले नाही कि शिव्या शाप दिला नाही . आता त्यांनी हे जे आरोप केले आहेत ते का मला माहित नाही . तरी हि त्यांना कोणत्याहि प्रकारे त्रास होईल असे वर्तन केले नाही. असे त्या मागील वेळी त्यांना विचारले असता म्हणाल्या होत्या .
पण आज दिलेल्या नँशनल ब्लॅक पँथर पार्टी पक्षाच्या भेटीत महाराष्ट्र निरिक्षक जीवन सिंग यांनी काही महत्वाचे मुद्ध्ये उपस्थित करुन या प्रकरणाविषयी शहानिशा केली. तसेच अति संवेदनशील मुद्द्यावर अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित केले की मागील महिन्यात नाबलीक गरोदर मातेच्या नवजात बलकाचा प्रस्तुति वेळी हलगर्जी च्या वागणुकीने मृत्यू झाला, तो कसा झाला याची सखोल चौकशी करावी तसेच परिचारीका आणि सह परीचारीका यांची नियोजित शिप्ट कारावी तसेच कोणावर हि ताण तणाव येणार नाही त्याच बरोबर जो काही गोंधळ निर्माण झाला आहे तो त्वरित थांबवावा आणि जे चुकीचे आहेत त्याच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही कारावी असे म्हणाले .
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे साहेब यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या घटने बद्दल चर्चा केली . तसेच डॉ. नलवडे यांनी वैदयकीय अधिकारी व आरोग्य सेविका तसेंच कंत्राटी आरोग्य सहायिक यांच्यामधील झालेल्या कथित वादावर जिल्हा आरोग्य अधिकारी जि. परिषद कोल्हापूर यांच्याकडे अहवाल सादर करून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून प्रा.आ. केन्द्रातील कामकाज सुरळीत चालवन्यासाठी योग्य तो प्रयत्न केला जाईल असे सांगून येत्या २० दिवसात योग्य ती कायदेशीर कार्यवाहि करण्याचे लेखी पत्र दिले.
निवेदन देताना कायदा व सूव्येवस्था याची अतिशय योग्य काळजी करवीर चे नायब पोलीस सुनील देसाई आणि पोलीस कॉ. सचिन जाधव तसेच होमगार्ड यांनी घेतली .
यावेळी उपस्थित नँशनल ब्लॅक पँथर पार्टी चे महाराष्ट्र निरिक्षक जीवनसिंग, जिल्हा आरोग्य अध्यक्ष अभिजीत आवळे, जिल्हा प्रभारी स्नेहा सरनाईक आणि जीवनसिंग यांचे स्वीय्य सहाय्यक नवनाथ कलढोण तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ० नलवडे आणि अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ० सुधीर राजदिप उपस्थित होते. तसेच शिरोली ( दु.) ग्रामपंचयातचे ग्रामसेवक मा. कांबळे हे ही उपस्तीत होते. तरी दिलेल्या वेळेत जर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर अतिउग्र आंदोलन करू असे प्रतिपादन नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी कडून करण्यात आले.
0 Comments