Ticker

6/recent/ticker-posts

14 एप्रिल, भिमजयंतीचे नियोजन शासनाने योग्य पद्धतीने करावे....**आंबेडकरी समाज, पक्ष, संघटनांचे पालकमंत्री व प्रशासनास निवेदन!

*14 एप्रिल, भिमजयंतीचे नियोजन शासनाने योग्य पद्धतीने करावे....*
*आंबेडकरी समाज, पक्ष, संघटनांचे पालकमंत्री व प्रशासनास निवेदन!*
कोल्हापूर दि. ५ एप्रिल
      विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरी जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात जगभर साजरी केली जाते. वर्षानुवर्ष होत असलेल्या या जयंती महोत्सवाचे यावर्षी कोरोना महामारी मुळे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेवून जयंती कार्यक्रमासाठी योग्य ते नियोजन करावे असे निवेदन आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना जनआंदोलन, जिल्हा कोल्हापूर च्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी डी पाटील यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचे निमित्त करून डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रशासनाने अडथळे आणू नयेत. तसेच योग्य परवाने आणि काटेकोर नियमांचे पालन करण्याच्या अटीवर जयंती कार्यक्रमास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली
. बिंदू चौक कोल्हापूर येथे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, खा. दिघे फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जमणारे लाखो अनुयायी यांना महामानवास योग्य पद्धतीने अभिवादन करता यावे याकरिता प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे आहे असे आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या वतीने प्रा. शहाजी कांबळे यांनी पालकमंत्री सतेज पाटील तसेच प्रशासनास सांगितले. 
खा. दिघे फाउंडेशन च्या वतीने बिंदू चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू, मध्य प्रदेश याची प्रतिकृती उभा केली जाणार आहे, त्याला परवानगी देण्यात यावी. तसेच दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता आंबेडकरी अनुयायांच्या कडून ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले जाते, यावेळी जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भिम अनुयायी येतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रकोप पाहता प्रशासनाने योग्य नियोजन करुन जयंती कार्यक्रमास परवानगी द्यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
      तसेच जिल्ह्यामध्ये गावोगावी, शहर-उपनगरात साजर्या केल्या जाणार्या भीम जयंती कार्यक्रमांना कोरोना महामारीचे निमित्त करुन आंबेडकरवादी समाजाची दिशाभूल करु नये, असे आदेश प्रशासनाला व संबंधित पोलिस स्टेशनला देण्यात यावेत असेही या निवेदनात म्हटले आहे. 
हे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांना देण्यात आले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, कोल्हापूर शहराच्या आयुक्त मा. बलकवडे मॅडम, जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हजर होते.
     आंबेडकरी समाज पक्ष संघटनांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनाच्या शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर, मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गायकवाड सर, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, रिपाइं पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे, दिघे फाऊंडेशनचे अध्यक्ष सदानंद दिघे,  मातंग ट्रस्टचे अध्यक्ष एस. पी. शेंडगे, संग्राम मोरे (सांगली), कला अॅकेडमीचे माने साहेब, जयंती समिती सदस्य प्रविण आजरेकर आदि हजर होते. 
    पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब यांनी निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करुन, जनतेच्या भावनांचा आदर करून उद्यापर्यंत निर्णय घेऊ असे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments