Ticker

6/recent/ticker-posts

धनसंपत्ती,सत्ता,मान सन्मानाच्या नादात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहोत : डॉ.शर्वरी मिरगुंडे

धनसंपत्ती,सत्ता,मान सन्मानाच्या नादात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहोत : डॉ.शर्वरी मिरगुंडे 

कागल प्रतिनिधी
विजय कांबळे

 व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयामध्ये त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार होते. डॉ.शर्वरी मिरगुंडे पुढे म्हणाल्या, मुलींनी आणि महिलांनी सक्षम होऊन आरोग्याची काळजी घ्यावी. सात्विक आहाराने शारीरिक बदल होऊन निरोगी जीवन जगता येते.शारीरिक व मानसिक बदलाने घाबरून जाऊ नये.आहार,विहार आणि विश्रांती याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.या निमित्ताने विद्यालयाच्या सर्व मुलींना रोटरी क्लब ऑफ कागल एमआयडीसी यांच्यावतीने सॅनिटरी नॅपकिन व मास्कचे वितरण करण्यात आले.
     यावेळी मनिष देशपांडे,दिपा देशपांडे,संतोष साखळकर, तसेच विद्यालयाच्या सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे स्वागत इंगवले.आर.व्ही यांनी केले प्रास्ताविक मोरे.एम.जी यांनी केले सूत्रसंचालन वैराट जे.बी. यांनी केले तर आभार पोवार.ए.ए यांनी मानले.

Post a Comment

0 Comments