१९९० पासून हे कामगार कामं करत आहेत . असे ६४० कामगार आहेत तर या मधील काहीजण सेवा निवृत्तीस आले आहेत .
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने तात्काळ प्रस्ताव मंजूर केल्यास याचा फायदा सर्व रोजंदारी कामगारांना होणार आहे.
हा विषय घेऊनच पँथर पक्षाने अनेक वेळा निवेदन दिले आणि याचा पाठपुरावा केला आहे.
दिनांक २१ जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक ३६ मध्ये आरोग्य विभागचे रोजनदारीवरील सफाई कामगार सुनील आवळे यांना हृदय विकराचा झटका आला होता मात्र सबंधी विभागाने याकडे लक्ष न दिल्याने तसेच डॉक्टरानी त्यांना विश्रातिची गरज असल्याचे सांगितले आहे त्यामुळे त्याचा रोजी रोटी आणि अरोग्याचा प्रश्न तयार झाला आहे .
इतकेच काय तर या घटने कडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी सरळ पेशंटला घेऊन पालिकेत सरळ ऍम्ब्युलन्स च सायरन वाजवत गेट मधून आत्ता घातली होती .
त्या वेळी उप आयुक्त १ यांनी योग्य चौकशी करुन कार्यवाही करण्याचे अश्वासन दिले होते .
रोजनदारी वर कामं करण्याऱ्या कामगारांना कोणत्या कामाच्या ठिकाणी अवश्य त्या सोई सुविधा आणि वस्तु पूर्वल्या जात नाहीत कि त्यांना कोण वाली नाही अशी अवस्था झाली आहे . .
जो पर्येंत मागण्या मान्य होत नाहीत आणि लेखी देत नाही तो पर्येंत उप आयुक्त यांच्या ऑफिस मधून उठणारच नाही अशी भूमिका घेतल्याने उप आयुक्त यांनी त्यांना लेखी अश्वासन दिले आहे .
कायम स्वरूपी होईल या आशेवर हे कामगार कामं करत आहेत . तर कायम स्वरूपी करता यावे म्हणून शासन दरबारीं प्रस्ताव पाठविणे साठी हालचालींना वेग आला आहे .
दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करताना नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाचे महाराष्ट्र निरिक्षक जीवनसिग आणि अभिजित आवळे, स्नेहा सरनाईक , नवनाथ कलढोण , योगेश कांबळे उपस्थित होते .
0 Comments