येथील शिवछत्रपती मर्दानी आखाडा यांच्या वतीने वर्धापन दिनाचे औचीत्य साधून चित्त थरारक मैदानी खेळाची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. (आणि उपस्थित पेक्षकांना मंत्रमुग्ध केले)
या मैदानी खेळाच्या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन वीर पत्नी हेमलता संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिव प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन वस्ताद आनंदा पाटील, माजी मुख्याद्यापक डी.एस ढगे, अशोक सुतार, एच.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये श्रीमंतयोगी मर्दानी आखाडा पाडळी खुर्द शिवछत्रपती मर्दानी आखाडा शेळेवाडी, छावा मर्दानी आखाडा टोप, न्यू तानाजी प्रेमी आखाडा नागदेववाडी, सह्याद्री प्रथीष्ठान मर्दानी आखाडा कराड, शिवशंभो मर्दानी आखाडा निपाणी, शिव छत्रपती मर्दानी आखाडा निगवे खालसा हे संघ सहभागी झाले होते.
यावेळी को.जि.मा.शि.चे माजी चेअरमन एच. आर.पाटील, अर्जुन निकम, संदीप खराडे, बाळू पाटील आदी उपस्थित होते. सर्व हत्यारांचे पूजनही वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रा.पं. समोरील मैदानात “लाठी काठी चालविणे, दांडपट्टा चालविणे, फरी गदगा, ढाल तलवार, भाला, पाश, चक्र चालविणे, तलवारीने लिंबू काढणे, केळ कापणे, हाताने नारळ फोडणे, कपाळावर नारळ फोडणे, विद्युत च्या वेगाने तलवारबाजी, विठ्या फेकणे हा धोकादायक परकार, तोंडावर केळ ठेऊन तलवारीने कापणे, वनवटी खालचे लिंबू कापणे, आगीचे पाईप फिरविणे” असे अंगावर शहारे आणणारे चित्तथरारक प्रकार दाखविण्यात आले त्यामुळे प्रेक्षक थक्क झाले.
सर्व कार्यक्रम सूत्रसंचालन माजी मुख्याद्यापक डी.एस. ढगे यांनी आपल्या शैलीदार भाषेत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवछत्रपती मर्दानी आखाड्याचे अशोक सुतार, अशोक परिट, निलेश पाटील, उदय कांदळकर, प्रशिक्षक शुभम सुतार, ओंकार पाटील, विनोद सुतार, इंद्रजीत सोनाळकर, अक्षय परिट, सुशांत कुंभार, सौरभ सुतार, ऋषीकेश परीट, प्रमोद कोपर्डेकर, संभाजी पाटील, योगेश चौगले व मंडळाच्या कार्यकार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाला युवक, युवती, महिला, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
0 Comments