नंदगांव प्रतिनिधी :
दुधाचे उत्पादन व दर्जा वाढविण्यासाठी दूध उत्पादकांनी जनावरांचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे . असे डॉक्टर प्रकाश दळवी यांनी नंदगाव येथील हर हर महादेव दूध संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दूध उत्पादक सभासदांना बक्षीस वितरण समारंभात सांगितले . पाच वर्षापूर्वी संस्था स्थापनेवेळी संस्थेचे दूध संकलन दोनशे पन्नास लिटर इतके होते ते आज सहाशे लिटर इतके झाले आहे संस्थेचा पारदर्शक कारभार व सभासदांचा असलेला संस्था व्यवस्थापना वर असलेला विश्वास यामुळेच संस्थेची वाटचाल यशस्वीपणे होत असल्याचे संस्थेचे संस्थापक व नंदगाव गावचे माजी सरपंच शाबाजी कुराडे यांनी सांगितले. यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विमा संरक्षण अधिकारी के. वाय. पाटील यांनी जनावरांच्या व दूध उत्पादकांच्या विमा संरक्षणाबद्दल माहिती देऊन लोकांच्या शंकेचे निरसन ही केले. तसेच यावेळी प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या सभासदांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात आले व अन्य दूध उत्पादकांना भेटवस्तू चे वाटपही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन कृष्णात कुराडे . व्हा. चेअरमन अशोकराव कुंभार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी दूध उत्पादक व ग्रामस्थ ही उपस्थित होते.
0 Comments