Ticker

6/recent/ticker-posts

कलाकार दिग्विजय यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ

दिग्विजय कलाकार ते पोलिस 

कोल्हापूर प्रतिनिधी :
दिग्विजय हिंदुराव तळेकर वय (31)यांंचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले छातीत कळ आल्याचे निमित्त झाले  आणि त्यातच त्यांंची प्राणज्योत मालवली ऐका क्षणात होत्याच नव्हतं झाल. भुयेवाडि (ता, करवीर) येथील तळेकर कुंटुब आहे दिग्विजय च्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे  दिग्विजय हा मूळचाच कलाकार होता त्याने काही नाटक पण केली होती, त्यातुन त्याला पोलीस होण्याची आवड होती ते त्याचे स्वप्न पुर्ण झाले पोलीस भरती झाला त्याची परिस्थिती बेताची होती वडिलांनी चालक म्हणून नोकरी करून त्याला शिक्षण दिले दिग्विजय ऐकूलता ऐक मुलगा होता तो उत्तम गाणी म्हणायचा त्याचे आवडत गाण (माझ माहेर पंढरी)  तो अभंग सत्तत गायचा त्याच्या
गाण्याचा आवाजात लोक तल्लीन होऊन जायचे
तीन वर्षा पूर्वी तो मुंबई पोलिस दलात भरती झाला त्यानंतर गेल्या 6 जूनला त्याचे लग्न झाले त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे त्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते दोन दिवसापूर्वी  तो सुट्टी वर आला होता आणि पहाटे  साडे पाच वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागले तो जागा झाला त्याच्या घशात खवखवत होतं त्यानंतर त्याना उलटी झाली थोडे बरे वाटले होते तोवर तो खाली पडला तातडीने त्याला सी,पी आर या हाँस्पीटल मधे घेऊन गेले तो पर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच सर्वाना धक्काच बसला व दिग्विजय याच्या कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला भुयेवाडि या गावातील लोकांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन श्रध्दांजली वाहिली 


कोरोना लस घेतल्यानंतर...... 
 तो पोलिस दलात असल्याने दहा दिवसापुर्वी कोरोना लस घेतली होती त्यानंतर त्याने दोन दिवस सुट्टी केली व प्रकृतीची तक्रार नसल्याने सुट्टीवर गावी आला शवविच्छेदनानंतर त्याचा रिपोर्ट मात्र राखून ठेवण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments