राजकीय हस्तक्षेप असल्याचे जाणकारांचे मत
म्हासुर्ली हे गाव दुर्गम असुन येथील धनगर वाड्यांना रस्तेही सरळ नाहीत.जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यानी प्रयत्न करून मासुर्ली गावा साठी रुग्णवाहिका मंजूर करून धामोड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली होती व ती रुग्णवाहिका मासुर्लीला देण्यात येणार होती पण अचानक सदर रुग्णवाहिका सरवडे येथे नेण्यात आली.यामुळे मासुर्ली गावावर अन्याय झाला असून म्हासुर्ली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ या बाबत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. उप सरपंच राजेंद्र सखाराम पाटील म्हासुर्ली.
यामध्ये राजकीय षडयंत्र असल्याचे वर्तविण्यात येत आहे, म्हासुर्ली भाग दुर्गम आणि डोंगराळआहे त्यामुळे ईथे रूग्णांना पायी चालत किंवा खाजगी वाहनाने दवाखान्यात यावे लागते हि बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी रूग्णवाहीका मंजूर करून दिली होती ती अचानक सरवडे या गावी कशी नेण्यात आली या पाठीमागे काहीतरी राजकीय खेळी असल्याची भावना संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे. यासाठी तीव्र आंदोलन करणार असे मत उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.

0 Comments