*कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा रौद्र रूप, परिस्थिति चिंताजनक*

                                                                               सचिन पाटील सर (प्रतिनिधी)

 

(प्रतिनिधी) 

 कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात देखील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी कोरोना सेंटर देखील फुल्ल झाली आहेत. गावातील रुग्णांना त्याठिकाणीही बेड उपलब्ध होत नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या 12 तालुक्यांमध्ये जानेवारीपासून 13 ते 14 हजार कोरोनाचे (corona news today) रुग्ण आढळून आले आहेत. अजूनही आठ हजार रुग्ण आहेत.


कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावकर्‍यांनी अतिशय चांगले काम करत गावाच्या वेशीवर कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई, पुणेसारख्या शहरात काम करणार्‍या गावच्या चाकरमान्यांना देखील गावकर्‍यांनी थेट प्रवेश नाकारला होता.


ग्राम समिती प्रभावपणे कार्यरत होत्या. एका गावकर्‍याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला तरी संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याची सक्ती करण्यात येत होती. त्यांना अलगीकरण केंद्रात ठेवले जात होते. 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने (corona news today) ग्रामीण भागातही रौद्र रूप धारण केले आहे. गगनबावड्यासारखा दुर्गम आणि डोंगराळ तालुका देखील यातून सुटला नाही. सर्वात छोटा असणार्‍या या तालुक्यात आजही 41 कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरालगत असलेल्या करवीर तालुक्यात 1 हजार 636 तर हातकणंगले तालुक्यात 1 हजार 423 कोरोनाचे रुग्ण आहेत. 


कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येऊ लागली. पूर्वी कोव्हिड सेंटरसाठी साहित्य पुरविले जायचे. परंतु यावेळी जिल्हा परिषेदेने एकत्रित खरेदी बंद केली आहे. त्यामुळे कोव्हिड सेंटरना साहित्य देण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात सध्या 63 कोव्हिड सेंटर आहेत. त्यामध्ये सर्वाधिक वीस कोव्हिड सेंटर शिरोळ तालुक्यात आहेत. त्यापाठोपाठ हातकणंगले तालुक्याचा क्रमांक लागतो. जानेवारीपासून ग्रामीणमधील 663 नागरिकांचा मृत्यू झाला आहे

ग्रामीण भागातील लोक उपचारासाठी लवकर दाखल होत नाहीत. लक्षणे दिसताच कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे.